कामाची गोष्ट ! तुम्ही नोकरी करता की व्यवसाय ? ‘या’ 7 गोष्टींमुळे वाचू शकतो तुमचा इनकम टॅक्स, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अनेकजण टॅक्स भरण्याच्या शेवटच्या क्षणी तो कसा वाचवता येईल याचा विचार करायला लागतात. नोकरी करणाऱ्यांसाठी तर पहिले तीन महिने खूप तणावाचे असतात. टॅक्स बाबत अखेरच्या क्षणी विचार करण्यापेक्षा वर्षभर आधी नीट प्लॅन केला तर कोणतीही अडचण निर्माण होत नाही.

पुढील सात गोष्टी टॅक्स वाचवण्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतात

1) हेल्थ इन्शुरन्स प्रिमियम
इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 D नुसार मेडिकल इन्शुरन्ससाठी दिल्या जाणाऱ्या प्रिमियमवरचा टॅक्स वाचवू शकतो.

2) काही खास सेव्हिंगवर मिळते करसवलत
सेक्शन 80 TTA नुसार सेव्हिंग खात्यांवर मिळणाऱ्या व्याजावर सूट मिळते. बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा टाइम डिपॉझिटमधून मिळणाऱ्या व्याजावर या सेक्शननुसार सूट मिळणार नाही.

3) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
NPS खाती दोन प्रकारची असतात. NPS टायर – 1 अकाउंट प्रायमरी अकाउंट असतं. NPS टायर – 2 अकाउंट कोणत्याही लॉक इन पिरेडचं पर्यायी खातं असतं. यामध्ये गुंतवलल्या रकमेवरही कराची सवलत असते.

4) घरभाड्यावरही करसवलत
तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला करात सवलत मिळू शकते. सेक्शन 80 GG नुसार जास्तीत जास्त सवलत 60 हजार रुपयांवर आहे.

5) लाइफ इन्शुरन्स प्रिमियम, बँक एफडी, ट्यूशन फी, सुकन्या समृद्धी योजना (SSY), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ELSS, पेन्शन फंड्स अशा योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर कर लागत नाही. यासाठी दीड लाख (1.50)रुपयांची मर्यादा आहे.

6) देणगीवरही करसवलत
सेक्शन 80 G नुसार 2 हजार रुपयांपेक्षा जादा देणगी दिली तर करसवलत मिळू शकते. ही देणगी कॅश, डिमांड ड्राफ्ट, बँक ट्रान्सफर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या स्वरूपात हवी.

7) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF
सरकारी योजना PPF हा एक चांगला पर्याय आहे. त्याचा मॅच्युरिटी पिरेड 15 वर्षांचा असतो. या अकाउंटवर मिळणारं व्याजही टॅक्स फ्री असतं.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like