जर तुम्हाला IT डिपार्टमेंटकडून ‘हा’ मेसेज आलाय तर व्हा ‘अलर्ट’, होऊ शकतं मोठं ‘नुकसान’, जाणून घ्या

नई दिल्ली, वृत्तसंस्था : प्राप्तिकर विभागाने करदात्यांना ‘फिशिंग’ ई-मेलद्वारे पैसे परत करण्याचे आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहण्याचे सांगितले आहे. आयकर विभागाने रविवारी ट्वीट करून करदात्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे की, परताव्याचे कोणतेही वचन दिले आहे अशा कोणत्याही दुव्यावर क्लिक करू नये. हे संदेश प्राप्तिकर विभागाने पाठविलेले नाहीत. 8-20 एप्रिल दरम्यान विभागाने विविध करदात्यांना 9,000 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे 14 लाख परतावे दिले आहेत. यामध्ये वैयक्तिक, हिंदू अविभाजित कुटुंबे, मालक, कंपन्या, कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स आणि लघु व मध्यम उद्योग (SME) श्रेणी करदात्यांचा समावेश आहे.

खरं तर, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आयकर विभागाला करदात्यांना लवकरात लवकर परतावा देण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानंतर आयकर विभागाकडून करदात्यास ई-मेल पाठविला जात असून, आतापर्यंत 1.74 लाख प्रकरणांमध्ये पुष्टीकरणासाठी मेल पाठविले गेले आहेत. 8-20 एप्रिल दरम्यान विभागाने 9,000 कोटींचा परतावा जारी केला आहे.

विभागाने वैयक्तिक माहिती विचारली नाही

प्राप्तिकर विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे की करदात्यांनी सावध राहा, परताव्याचे आश्वासन देणाऱ्या अशा बनावट दुव्यावर क्लिक करू नका. हे संदेश प्राप्तिकर विभागाने पाठविलेले नाहीत. कृपया येथे तपशील काळजीपूर्वक वाचा https://incometaxindia.gov.in/Pages/report-phishing.aspx. यात लिहिले आहे की प्राप्तिकर विभाग ई-मेलद्वारे तपशीलवार वैयक्तिक माहितीची विनंती करत नाही. आयकर विभाग पिन क्रमांक, पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड, बँका किंवा इतर वित्तीय खात्यांवरील माहितीसाठी विनंती करणारे ई-मेल पाठवत नाही.

प्राप्तिकर विभागाचे म्हणणे आहे की ते करदात्यांना ई-मेल पाठवून परताव्यावर प्रक्रिया करण्यासाठी कन्फर्मेशन मागत आहेत. अशी सर्व कन्फर्मेशन केवळ आयकर विभागाच्या अधिकृत ई-फाइलिंग पोर्टल – http://www.incometaxindiaefiling.gov.in द्वारे करणे आवश्यक आहे.