सरकारकडून IT रिटर्नमध्ये मोठा बदल, 1 लाख वीज बील भरणार्‍यांना आता भरावा लागणार नाही ‘हा’ फॉर्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाइल करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण सरकारने आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार 1 लाख रुपये वीज बील भरणारे करदाते इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म – 1 भरु शकणार नाहीत. याशिवाय घर संयुक्त मालक हक्क असलेले करदाते वर्षाला ITR-1 किंवा ITR-IV मध्ये रिटर्न भरु शकणार नाहीत.

एक नियम असाही आहे की बँक खात्यात 1 कोटी रुपये जमा करणारे, परदेश पर्यटनावर 2 लाख रुपयांपर्यंत खर्च करणारे करदाते आता ITR-1 चा प्रयोग करु शकणार नाहीत. यासंबंधित नव्या फॉर्मची माहीती देण्यात येणार आहे. अशा करदात्यांना आता दुसऱ्या फॉर्मच्या माध्यमातून रिटर्न फाइल करावे लागेल. या नव्या फॉर्मची माहिती येणाऱ्या काळात मिळेल.

सरकार दर वर्षी एप्रिलमध्ये इनकम टॅक्स रिटर्न फॉर्मसंबंधित माहिती देते. यावर्षी सरकारने असेसमेंट इयर 2020 – 21 साठी 3 जानेवारीला नव्या फॉर्मचे नोटीफिकेशन दिले आहे.

यांच्यासाठी आहे ITR-1 फॉर्म –
ITR-1 फॉर्मच्या माध्यमातून रिटर्न फाइल करणे सोपे झाले आहे. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते या फॉर्मच्या माध्यमातून आयटीआर फाइल करतात. तर ITR-4 सुगम फॉर्म HUF (हिंदू यूनाइटेड फॅमिली) आणि कंपन्यांसाठी (LLP सोडून) आहे. ज्या लोकांच्या उद्योग धंद्यातून उत्पन्न येते त्यांना देखील ITR-4 फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

काय आहे बदल –
एका नोटिफिकेशननुसार, ITR फॉर्ममध्ये यंदा बदल करण्यात आले आहेत. जर एखादा करदाता हाऊस प्रॉपर्टीममध्ये संयुक्त मालकी हक्क ठेवत आहे तर हे लोक ना की ITR-1 फॉर्म आणि ना की ITR-4 भरु शकतील.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/