मोदी सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा ! फॉर्म-16 जारी करण्यासह अनेक योजनांची अंतिम तारीख वाढवली, जाणून घ्या नवीन डेडलाईन्स
नवी दिल्ली : वृत्त संस्था – Income Tax | मोदी सरकारने कोरोना महामारीची दुसरी लाट पाहता सामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने इन्कम टॅक्स (Income Tax) च्या बाबतीत लोकांना अनेक सवलती दिल्या आहेत.
सरकारने परमर्नंट अकाऊंट नंबर (PAN) आधारशी लिंक (PAN-Aadhaar Link) करण्याची डेडलाइन वाढवण्यासह टीडीएस रिटर्न (TDS Returns) सह इन्कम टॅक्स रिटर्न दाखल (ITR Filing) करण्याचा कालावधी वाढवला आहे.
इतकेच नव्हे, फॉर्म-16 (Form-16) जारी करण्याचा कालावधी सुद्धा (Last Dates Extended) वाढवला आहे.
टीडीएस रिटर्न दाखल करण्याचा कालावधी वाढवला
केंद्राने वर्ष 2020-21 (AY 2021) साठी टीडीएस रिटर्न दाखल करण्याचा कालावधी 15 जुलै 2021 पर्यंत वाढवला आहे.
यामुळे त्या टॅक्सपेयर्सला फायदा मिळेल ज्यांनी अजूनपर्यंत टीडीएस रिटर्नसाठी आयटीआर दाखल केलेला नाही.
31 जुलै 2021 पर्यंत जारी करता येऊ शकतो फॉर्म-16
तर, प्राप्तीकर विभागाने फॉर्म-16 जारी करण्याचा कालावधी वाढवून 31 जुलै 2021 केला आहे.
विवाद से विश्वास स्कीमचा कालावधी वाढवला
तसेच टॅक्सशी संबंधीत वादांचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या,
विवाद से विश्वास स्कीम (Vivad se Vishwas scheme)
अंतर्गत व्याजाशिवाय पैसे भरण्याचा कालावधी आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.
पॅन-आधार लिंक करण्याचा कालावधी 3 महिने वाढवला
सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 केली आहे.
Web Title : Modi Government | relief to taxpayers last date extendedfor many schemes including issuance of form 16 and pan aadhaar link check new deadlines
WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल
Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज
Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी