सरकारची मोठी घोषणा ! ITR भरला नसेल तर आता दंडासाठी तयार रहा, यापुढे मुदतवाढ नाही, CBDT कडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयटी रिटर्न (IT Return File) भरण्यासाठी करदाते आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करत होते. मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याच्या सर्व करदात्यांना इच्छेवर पाणी फेरले आहे. यापुढे आयटी रिटर्न भरण्याची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सीबीडीटीकडून स्पष्ट केले आहे. यामुळे कर विभाग आणि सरकारच्या कामकाजात अडथळा येऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ज्या करदात्यांनी आयटी भरला नाही त्यांनी अंतिम तारखेच्या आत कर भरणे महत्वाचे आहे. अन्यथा तुमच्यावर दंड भरण्याची वेळ येऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.

आयटी रिटर्न म्हणजेच परतावा भरण्यासाठी ज्या करदात्यांनी 10 जानेवारीची अंतिम मुदत चुकली अशा करदात्यांना आता दंड भरावा लागणार आहे. कर भरण्यासाठी आणखी मुदतीची करदाते अपेक्षा करत होते. पण सीबीडीटीकडून ही मुदवाढ रद्द केली आहे. त्यामुळे ज्या करदात्यांना रिटर्न भरण्यापूर्वी ऑडिट रिपोर्ट दाखल करावा लागेल तो 15 जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे.

31 मार्चपर्यंत मुदतवाढीची केली होती मागणी
आयकर विभाग आयटी रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याच्या अनेक सूचना आल्या होत्या. कारण कोरोनाच्या जीवेघण्या संसर्गामुळे सगळ्यांवर आर्थिक अडचण होती. यामुळे सर्व श्रेणीतील करदात्यांसाठी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात यावी अशी सूचना केली होती.

कर भरणाऱ्यांची संख्या वाढली
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी आकडेवारीवरून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कर भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. 2019-20 मध्ये तब्बल 5.62 कोटी करदात्यांनी आयटी रिटर्न भरला होता. तर यावर्षी (2020-21) 10 जानेवारीपर्यंत 5.95 आयटीआर दाखल केल्या आहेत.