Income Tax Notice | तुम्हाला सुद्धा इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे का ? जाणून घ्या कामाची ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Notice | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून (ITR Deadline) अनेक आठवडे उलटून गेले आहेत. यानंतर प्राप्तीकर विभागामध्ये (Income Tax Department) आयटीआर असेसमेंट (ITR Assesment) ची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी योग्य रिटर्न भरले (ITR Filing) त्यांना प्राप्तीकर विभागाकडून रिटर्न (Income Tax Refund) मिळत आहे, तर चुकीच्या करदात्यांना प्राप्तीकर विभागाकडून नोटीस (Income Tax Notice) मिळत आहेत. प्राप्तीकर विभागाकडून नोटीस मिळणे ही चांगली गोष्ट नाही, परंतु नोटीस मिळताच घाबरणे देखील योग्य नाही. प्राप्तीकर विभाग अनेक कारणांसाठी करदात्यांना नोटिसा पाठवतो. प्राप्तीकर विभागाकडून नोटिसा का येतात… नोटीस मिळाल्यास काय करावे… नोटिसांची भीती का बाळगू नये…ते जाणून घेवूया…

 

सामान्यत: लोक असे गृहीत धरतात की प्राप्तीकर रिटर्न भरल्यानंतर त्यांचे काम झाले आहे. हे खरे नाही. प्राप्तीकर रिटर्न म्हणजेच आयटीआर भरून देखील जे लोक चिंतेत आहेत त्यांनी जाणून घ्यावे की रिटर्न भरल्यानंतरही नोटीस येऊ शकते. प्राप्तीकर विभागाकडून अनेक प्रकारच्या नोटिसा करदात्याला येतात. भरलेला कर आणि करपात्र उत्पन्न यामध्ये तफावत असल्यास विभागाकडून नोटीस प्राप्त होते. प्राप्तीकर रिटर्नमध्ये जास्त रिफंडचा दावा करणे देखील नोटीसचे कारण असू शकते. (Income Tax Notice)

 

प्राप्तीकर विभागाकडून अनेक प्रकारच्या नोटिसा येतात. कोणत्याही व्यक्ती किंवा व्यवसाय किंवा कंपनीला पाठवल्या जाणार्‍या नोटीसनुसार, नोटीसची श्रेणी ठरवली जाते. सुमारे 15 ते 20 प्रकारच्या नोटिसा आहेत, यापैकी काही नोटीस अशा आहेत की ज्या व्यक्तींना पाठवल्या जातात.

 

Section 142 :

जर एखाद्या व्यक्तीने आयटीआर भरला नसेल, तर प्राप्तीकर अधिकारी त्याला सेक्शन 142 अंतर्गत नोटीस देऊन रिटर्न भरण्यास सांगू शकतात. या कलमांतर्गत किरकोळ माहिती किंवा स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटिसाही पाठवल्या जाऊ शकतात.

 

Section 143 (2) :

ही छाननीची नोटीस आहे. याचा अर्थ प्राप्तीकर विभागाला तुमच्याकडून आणखी काही तपशीलांमध्ये माहिती हवी आहे.
या अंतर्गत खात्यांचे पुस्तक, बँक स्टेटमेंट अशी अनेक माहिती विचारली जाऊ शकते. या आधारे मूल्यांकन केले जाईल.
इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर ही नोटीस येते. लोकांना ही नोटीस सर्वात जास्त मिळते.

 

Section 144 :

याला बेस्ट जजमेंट असेसमेंट (Best Judgement Assesment) म्हणतात.
जर तुम्ही आयटीआर दाखल केला नसेल किंवा सेक्शन 142 किंवा 143 (2) अंतर्गत जारी केलेल्या नोटीसला प्रतिसाद दिला नसेल, तर प्राप्तीकर अधिकारी सेक्शन-144 अंतर्गत नोटीस पाठवू शकतात.
अशा परिस्थितीत अधिकारी सध्याच्या माहितीच्या आधारे उत्पन्नाचे मूल्यांकन करू शकतात आणि त्यावर कर, व्याज आणि दंड आकारू शकतात.

 

Section 147/148/149 :

जर प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍याला वाटत असेल की काही उत्पन्न तुमच्या उत्पन्नाच्या पूर्वीच्या मूल्यांकनात समाविष्ट नाही किंवा तुमचे कोणते तरी उत्पन्न आहे जे यापूर्वी उघड केले गेले नाही, तर ही नोटीस येऊ शकते.

 

Section 143 (1) :

या अंतर्गत तुम्ही आयटीआरमध्ये कोणतीही चूक केली असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तेव्हा नोटीस येते.
अशा परिस्थितीत प्राप्तीकर अधिकारी नोटीस देऊन तुमची बाजू विचारतात.
तुम्ही उत्तराने समाधानी नसल्यास, तुमचा कर वाढवला जाऊ शकतो किंवा कपात कमी केली जाऊ शकते.

 

तसेच, सदोष रिटर्नसाठी सेक्शन 139 (9), सेक्शन 153 (अ), शोध आणि जप्तीसाठी सेक्शन 156, थकबाकीवरील कर,
व्याज किंवा दंड, सेक्शन 131 (अ) अंतर्गत उत्पन्न दडवल्याच्या संशयावरून नोटीस पाठवली जाते.

 

Web Title :- Income Tax Notice | reasons behind income tax notice how to answer check online status and other details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा