पिंपरी-चिंचवडमध्ये आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड मध्ये एका आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली असून आज पहाटे उघडकीस आली आहे.बबलू कुमार चंद्रेश्वर प्रसाद वय-३२ अस आत्महत्या केलेल्या आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे.त्यांनी ही आत्महत्या आजार कंटाळून केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.तसेच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे.मात्र दोनदिवसापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याने बबलू कुमार यांना बोलावून काम जमत नसल्याचं कारण देत शिवीगाळ केल्याची चर्चा सध्या त्यांच्या निवासस्थानी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड मधील आकुर्डी येथे राहणाऱ्या बबलू कुमार चंद्रेश्वर प्रसाद वय-३२ रा.आकुर्डी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्येपूर्वी बबलू कुमार यांनी चिठ्ठी लिहिलेली आढळली असून यात आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.घरात आई आणि ते स्वतः राहात होते.दोन वर्षांपूर्वी आजारपणामुळे त्यांचा पाय शरीरापासून बाजूला करण्यात आला होता,तेव्हा पासून ते ताण तणावात वावरत होते त्याचबरोबर त्यांच्यावर कर्ज देखील झाले होते.कर्ज आणि पाय गेल्याने त्यांनी विवाह देखील केला नव्हता अशी माहिती समोर येत आहे.परंतु निवस्थानी वेगळ्याच चर्चेला उधाण असून ही आत्महत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या अपमानास्पद वागणूक आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झाली असावी असं सांगण्यात येत आहे.अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

You might also like