मोठी बातमी ! ‘या’ अटीवर 31 मार्चनंतर देखील PAN कार्डला ‘आधार’कार्डशी लिंक करू शकाल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्ड (PAN Card) आधार (Aadhaar) शी जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे. जर आपण या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नसेल तर तो निष्क्रिय होईल. प्राप्तिकराचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर पॅनला आधारशी जोडणे हे बंधनकारकच आहे. परंतु जर आपण त्याला अंतिम मुदतीपर्यंत जोडू शकला नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही.

आपण ३१ मार्च नंतर देखील ते जोडू शकणार आहात. पण अट अशी असेल की जितक्या दिवस आपले पॅन कार्ड लिंक होणार नाही, तितके दिवस आपले पॅन कार्ड निष्क्रिय राहील. याचा अर्थ असा की आपण १० एप्रिल रोजी पॅन कार्ड लिंक केले, तर आपले पॅनकार्ड लिंक होईल परंतु ३१ मार्च नंतर आणि ९ एप्रिलच्या ते निष्क्रिय असेल. या दरम्यान तुम्हाला प्राप्तिकरचा लाभही देखील मिळणार नाही.

आयकर नियमात बदल

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ((CBDT) नवीन अधिसूचना जारी केली आहे. ज्यात प्राप्तिकरचे नियम १९६२ मध्ये बदलण्यात आले आहेत. आयकर नियम १९६२ च्या नियम ११४AA नंतर उप-कलम ११४AAA जोडला गेला आहे. या नवीन नियमांतर्गत, जर एखाद्या करदात्याने ३१ मार्च २०२० च्या आधी आपले पॅन कार्ड आधारशी जोडला नाही तर त्याचा काय परिणाम होईल, हे या नियमात दिसून येते.

CBDT च्या नव्या अधिसूचनेनुसार, १ जुलै २०१७ पर्यंत ज्यांना पॅन कार्ड वाटप करण्यात आले आहे, त्यांना ३१ मार्च २०२० पर्यंत आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे. कारण ३१ मार्चनंतर ते पॅन कार्ड निष्क्रिय होईल. तसेच ३१ मार्च नंतर आपण ज्या तारखेला जोडणार त्या दिवसापासून ते सक्रिय होतील.

नवीन उप-कलम ११४AAA नुसार, ज्या लोकांना १ जुलै २०१७ पर्यंत पॅन कार्ड वाटप करण्यात आले आहे. त्यांना ३१ मार्च २०२० पर्यंत आधारशी जोडणे आवश्यक आहे. कलम १३९AA च्या पोट-कलम (२) अंतर्गत आधार क्रमांक ३१ मार्च २०२० पर्यंत जर जोडू शकला नाहीत तर त्यांचा पॅन क्रमांक ३१ मार्च नंतर लगेचच निष्क्रिय होईल. जोपर्यंत आपण त्याला जोडणार नाहीत तोपर्यंत ते निष्क्रिय राहील.