‘गीता गोविंदम’ फेम ‘ही’ अभिनेत्री शुटींगमध्ये बिजी असताना तिच्या घरी आयकर विभागाचा ‘छापा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आहे. कोडुगू जिल्ह्यातील विराजपेठ इथल्या तिच्या घरी सकाळी 7.30 वाजता आयकर विभागाचा छापा पडला आहे. यावेळी रश्मिका मंदाना शुटींगमध्ये व्यस्त होती अशीही माहिती समजत आहे.

रश्मिकाच्या मॅनेजरने माहिती दिली की, रश्मिका हैद्राबादमध्ये शुटींगमध्ये व्यस्त होती. तिला काहीच कल्पना नव्हती. आयकर विभागाच्या दहा अधिकाऱ्यांकडून रश्मिकाच्या घराचा तपास सुरू होता. अधिकाऱ्यांनी तिचे बँक स्टेटमेंट आणि टॅक्स रेकॉर्डची तपासणी केली.

काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरू होती की रश्मिका ही सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. याबाबत तिनं एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. अशा चर्चा कुठून पसरतात हेच कळत नाही असंही ती म्हणाली होती.

रश्मिका मंदाना कोण आहे ?
रश्मिक फेमस साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस आहे. रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ‘किरीक पार्टी’ या सिनेमानं तिला लोकप्रियता मिळाली होती. महेश बाबू सोबत तिनं नीकेव्वरू या सिनेमात काम केलं आहे. अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडा याच्यासोबतही तिनं डिअर कॉम्रेड सिनेमात काम केलं आहे. यानंतर दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. विजय देवरकोंडासोबतचा तिचा गीता गोविंदम हा सिनेमा खूपच गाजला.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/