Income Tax raid | दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचा छापा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील मोठा वृत्तपत्र समुह ’दैनिक भास्कर’च्या (dainik bhaskar group) देशभरातील अनेक कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापा (income tax department raid) मारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोपाळमध्ये गुरुवारी सकाळी दैनिक भास्करच्या कार्यालयावर छापा मारण्यात आला. प्राप्तीकर विभागाच्या (income tax department raid) इन्व्हेस्टिगेशन विंगच्या छापेमारी अंतर्गत या टीम प्रेस कॉम्प्लेक्ससह अर्धा डझन ठिकाणांवर उपस्थित आहेत. कोरोना काळातील भयावह स्थिती जगासमोर मांडल्याने आणि पेगासस प्रकरणाचे रिपोर्टिंग केल्याने दैनिक भास्कर समुहाला टार्गेट करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

या छापेमारी दरम्यान स्थानिक पोलीस सुद्धा सोबत आहेत.
भोपाळसह इंदौर आणि जयपुरसह देशातील अनेक कार्यालयांवर छापे मारण्याची कारवाई सुरू आहे.
सांगितले जात आहे की संपूर्ण सर्च ऑपरेशन दिल्ली आणि मुंबई टीमद्वारे संचालित केले जात आहे.
या दरम्यान वृत्तपत्राच्या डिजिटल टीमला घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
सध्या प्रकरणात आणखी माहितीची प्रतिक्षा आहे.

नुकतेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान देशातील भायावह स्थिती जगासमोर मांडल्याने दैनिक भास्करचे अनेक रिपोर्ट चर्चेत आले होते.
या दरम्यान दैनिक भास्करच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडल्याने सोशल मीडियावर लोकांनी संपप्त प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

 

दैनिक भास्करवरील छाप्यावर प्रतिक्रिया

पत्रकार आणि लेखिका सबा नकवीने ट्विट केले, ग्रुपने दुसर्‍या लाटेदरम्यान शानदार वृत्तांकन केले हाते.
बस यामुळेच तर पत्रकार अरविंद गुणाशेखर यांनी ट्विट केले की, एनडीटीव्ही सूत्रांनुसार,
प्राप्तीकर विभाग टॅक्स चोरीच्या आरोपात दैनिक भास्करच्या देशातील अनेक कार्यालयांवर छापेमारी करत आहे.
अनेक टीम दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात शोध घेत आहेत.

द वायरचे संस्थापक संपादक एम. के. वेणु यांनी सुद्धा दैनिक भास्कर समुहावरील छाप्यांवर आपली प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे. एम. के. वेणु यांनी ट्विटरवर लिहिले गंगेवर तरंगणारे मृतदेह आणि पेगाससवर रिपोटिंगचे हे बक्षीस मिळाले?

तर, काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले की, प्राप्तीकर विभागाचे अधिकारी समुहाच्या सुमारे सहा परिसरात उपस्थित आहेत. यामध्ये राज्याची राजधानी भोपाळमध्ये प्रेस कॉम्प्लेक्समधील कार्यालयाचा सुद्धा समावेश आहे.

Web Title : Income Tax Raid | income tax department raid at many dainik bhaskar group offices in country

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Raj Kundra Porn Film Case मध्ये पूनम पांडेचा आरोप, अ‍ॅडल्ट अ‍ॅपवर मोबाइल नंबर केला होता लीक; पहा व्हिडिओ

Extortion Case against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, इतर 6 पोलिसांसह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर