Income Tax Raid | व्यापाऱ्याच्या घरात सापडलं घबाड! नोटांचे बंडल पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची उडाली झोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कानपूरच्या (Kanpur) एका व्यापाऱ्याच्या (Merchant) घरावर आयकर विभागाने छापा (Income Tax Raid) टाकला. यावेळी घरात लाखों रुपयांच्या नोटांचे बंडल पाहून अधिकाऱ्यांची झोपच उडाली. कानपुर आणि उन्नावमधील (Unnao) पाच वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाच्या पाच विशेष पथकांनी (Special Squad) छापेमारी (Income Tax Raid) करून आतापर्यंत 50 लाखांची रोकड जप्त (Cash Seized) केली आहे. शिशिर अवस्थी (Shishir Awasthi) असं या व्यापाऱ्याच नाव असून उपमन्यु ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे (Upmanyu Group of Industries) ते मालक आहेत. आयकरच्या पथकाने स्वरुप नगर परिसरातील घर, नया गंज येथील गोदाम (Warehouse), उन्नावमधील फॅक्ट्री आणि अन्य दोन ठिकाणी छापा टाकून तपास सुरु केला आहे.

पाच पथकांपैकी एक पथक शिशिर अवस्थी आणि त्यांच्या अकाउंटंटची चौकशी (Accountant Inquiry) करत आहे. तपासात त्यांचे दोन लॉकरदेखील असल्याची माहिती समोर आली आहे. कर चुकवेगिरी (Tax Evasion) केल्याची आयकर विभागाला शंका आल्याने ही कारवाई (Income Tax Raid) करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उन्नाव औद्योगिक परिसरात (Unnao Industrial Area) असलेल्या कारखान्यात पथकाला गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.

आयकर विभागाच्या पथकाने कागदपत्रे (Document), हार्डडिस्क (Hard Disk), संगणक (computer) जप्त केले आहेत.
काही दिवसांपासून अंडर बिलिंग केले जात होते. फेक इनवॉइस (Fake Invoice) तयार केले जात होते.
कॅश बुकमध्येही (Cash Book) त्रुटी आढळून आल्या असून स्टॉक (Stock) आणि रजिस्टरमध्ये खूप फरक आहे.
कमाई जास्त असतानाही रिटर्न कमी भरले जात असल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये कानपूरचे प्रसिद्ध ज्वेलर राजेंद्र अग्रवाल (Jeweler Rajendra Agarwal) यांच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागाने छापा टाकला होता. यामध्ये जवळपास 4.5 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Web Title :Income Tax Raid | income tax department raid in kanpur 50 lakh cash recovered

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा