RJ : आयकर विभागाकडून सर्वात मोठी छापेमारी; तब्बल 1700 कोटींचा ब्लॅक मनी, अब्जावधीची संपत्ती उघडकीस

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थान राज्यात आयकर विभागाने (income tax department) मोठी धाड टाकली आहे. अधिकाऱ्याने धाड टाकल्याने कोट्यवधींचा बेकायदी काळा पैसा असल्याचे समोर आले आहे. इनकम टॅक्स विभागाची (income tax department) ही कारवाई राजस्थानातील सर्वांत मोठी असल्याचे समजते. जयपूर येथे सराफ व्यापार दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही ठिकाणांवर इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. इनकम टॅक्स अधिकाऱ्यांची ही कारवाई पाच दिवस चालली होती. यामध्ये ५० पथके आणि २०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

इनकम टॅक्स विभागाकडून मिळाल्या माहितीनुसार, राजस्थानातील जयपूर येथे एका सराफ व्यापारी यांच्याकडे बेकायदा काळा पैसे उघडकीस आला. यामध्ये तब्बल ७०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. सलग पाच दिवस इनकम टॅक्सचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची छाननी करण्यात गुंतली होती. तीन मोठे व्यवसायिक समूह सिल्व्हर आर्ट ग्रुप, चोरडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुप यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये १७०० ते १७५० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे उघडकीस आले आहे. यासह किमती वस्तू, मूर्ती, महागडी रत्ने, वस्तू या भूयारातून सापडल्या आहेत, असे सांगितले जात आहे.

तसेच तीन बड्या व्यवसायिक ग्रुपच्या कार्यालयात २०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे सापडली असून, सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आले आहे. आयकर विभागाची ५० जणांची तुकडी सलग पाच दिवस या उद्योग समूहांच्या ठिकाणी कारवाई करण्यात गुंतली होती, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली. आयकर विभागाकडून या सर्व वस्तू, कागदपत्रांचा सविस्तर तपास करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.