Income Tax Refund चे पैसे आले नाहीत का? प्राप्तीकर विभागात नोंदवा तक्रार, जाणून घ्या सविस्तर माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Income Tax Refund | एखाद्या आर्थिक वर्षात तुमच्या गुंतवणुकीच्या आधारावर अ‍ॅडव्हान्स कापला जातो, परंतु फायनान्शियल इयरच्या अखेरपर्यंत फायनल कागद जमा झाल्यानंतर समजते की तुमच्या दायित्वानुसार जास्त कर कापला असेल तर प्राप्तीकर विभागाकडून तो परत घेण्यासाठी तुम्हाला आयटीआर रिफंडसाठी (Income Tax Refund) अप्लाय करायचे आहे.

 

Income Tax Return (ITR) दाखल करणारे बहुतांश लोकांचे रिफंड एकतर आले आहेत किंवा प्रोसेसमध्ये आहेत. तुम्ही वेळेवर रिटर्न दाखल केला असेल आणि रिफंड अजूनपर्यंत आलेला नसेल तर तुम्ही तो चेक करू शकता आणि रिफंड (ITR Refund) न येण्याच्या स्थितीत याबाबत तक्रार प्राप्तीकर विभागात करू शकता.

 

आयकर विभागाने (Income Tax Dept) रिफंड म्हणून 1.23 लाख कोटी रुपये टॅक्सपेयर्सला परत केले आहेत. प्राप्तीकर विभागानुसार, या रक्कमेत 2021-22 च्या अंतर्गत 75.75 लाख करदातात्यांना करण्यात आलेल्या रिफंडचा सुद्धा समावेश आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 15,998.31 कोटी रुपये रिफंड केले आहेत. (Income Tax Refund)

 

असा तपासा रिफंड

 

  • तुम्ही वेळेवर आयटीआर दाखल केला असेल तर www.incometax.gov.in वर जाऊन रिफंडची स्थिती तपासू शकता.
  • यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड म्हणून पॅन टाकून आपल्या खात्यात लॉग-इन करा.
  • खाते उघडल्यानंतर ‘ई-फाइल’ च्या ऑपशनवर क्लिक करून ‘ई-फाइल’ ऑपशनमध्ये ‘आयकर रिटर्न’ निवडा.
  • येथे ‘फाइल केलेला रिटर्न पहा’ ऑपशनवर क्लिक केले की, समोर रिटर्नची स्थिती दिसेल.
  • रिफंड ट्रॅकिंगसाठी तुम्ही प्राप्तीकर विभागाची वेबसाइट टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html वर जाऊन पूर्ण माहिती जमवू शकता.
  • या पेजवर पॅन कार्ड नंबर (PAN Card) नोंदवावा लागेल. खालील कॉलमध्ये असेसमेंट ईयर (Assessment Year) भरा आणि नंतर खाली दिलेला कॅप्चा कोड नोंदवा. अशाप्रकारे तुम्ही टॅक्स रिफंडची स्थिती जाणून घेवू शकता.
  • Captcha कोड नोंदवल्यानंतर रिफंडच्या पैशांच्या स्थितीच्या आधारावर, स्क्रीनवर एक मेसेज दिसेल.

 

येथे नोंदवू शकता तक्रार

 

जर तुमच्या बँक खात्यात रिफंड आलेला नसेल तर तुम्ही यासाठी प्राप्तीकर विभागात तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही तुमची तक्रार ई-मेलद्वारे [email protected] वर पाठवू शकता. 1800-425-9760 वर एसबीआय कॉल सेंटरवर कॉल करून सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता.

 

तुम्ही एका कागदावर तक्रार नोंदवून हैद्राबाद येथील या पत्त्यावर पाठवू शकता –

 

भारतीय स्टेट बँक, सर्वेक्षण संख्या 21, हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठासमोर, मुख्य प्रवेशद्वार, गाचीबोवली, हैद्राबाद -50001.

 

Web Title : Income Tax Refund | income tax refund status online itr filing itr refund status ITR Return check here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा 31 मार्चपर्यंत मिळेल लाभ; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया अन् कोणाला होणार फायदा

District Central Cooperative Bank | पुण्यासह ‘या’ 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हाय कोर्टाची परवानगी