Income Tax return file | IT रिटर्न फाईल करणे झाले सोपे ! आता तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता ITR File, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Income Tax return file | इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax return file) करणार्‍यांसाठी कामाची बातमी आहे. आता आयटी रिटर्न फाईल करणे सोपे होईल, कारण इंडिया पोस्ट (Post Office) सुद्धा आता जवळच्या पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (Post Office, CSC) काऊंटरवर आयटीआर फाईल करण्याची सुविधा देत आहे. याबाबत इंडिया पोस्टने अगोदरच घोषणा केली आहे. जी संपूर्ण देशातील लाखो पगारदार करदात्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

काय म्हटले इंडियन पोस्टने?

इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, आता तुम्हाला आयटीआर फाईल (ITR File) करण्यासाठी जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही.
कारण तुम्ही सहजपणे आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या सीएससी काऊंटरवर आयटीआर दाखल करू शकता.

असे करा आयटीआर फाईल

Post Office च्या सीएससी काऊंटरवर संपूर्ण देशात भारतातील लोकांसाठी सिंगल अ‍ॅक्सेस पॉईंट प्रकारे काम होते.
जिथे एकाच विंडोवर पोस्टल बँकिंग आणि इन्श्युरन्स संबंधी विविध सेवा मिळतात.
कुणीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या सीएससी काऊंटरवरून विविध सरकारी योजनांशी संबंधीत माहिती आणि त्याद्वारे होणारे लाभ मिळवू शकतो.
याशिवाय या काऊंटरवरून भारत सरकार भारतीय नागरिकांना डिजिटल इंडिया प्रोग्राम अंतर्गत विविध ई-सर्व्हिसेस उपलब्ध करून देते.

Web Title : Income Tax return file | good news for taxpayers now you can file itr your nearby post office check how

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Mayor Kishori Pednekar | पोलखोल ! ‘उद्यानास टिपू सुलतान नाव देण्यास भाजपचा विरोध, पण पूर्वी BJPनेच दिला होता होकार’

Miraj Shivsena Chief Arrested | 20 लाखाच्या चेक चोरी प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख गजाआड, शहरात खळबळ

Personal Loan | तुम्हाला सुद्धा पैशांची गरज आहे का? इथं मिळेल मिनिटात 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या