मोठा दिलासा ! इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणखी मिळाली सूट, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अधिक वेळ दिला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआर भरण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इनकम टॅक्स विभागाने शनिवारी एक निवेदन सादर करुन सांगितले की, ”सध्याचा काळ लक्षात घेता आम्ही पुन्हा एकदा मुदत वाढविली आहे. इनकम टॅक्स विभागाने आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. आशा आहे की, यामुळे करदात्यांना चांगल्या नियोजनात मदत होईल.”

COVID-19 संकटादरम्यान करदात्यांना दिलासा मिळाल्यामुळे इनकम टॅक्स विभागाने गुरुवारी कर बचत गुंतवणूक / भरपाईची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत वाढविली. आर्थिक वर्ष 2019-20 साठी वैयक्तिक इनकम टॅक्स रिटर्न व अन्य रिटर्नची मुदत 31 जुलैऐवजी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.