‘आयकर रिटर्न’ भरताना ‘या’ गोष्टी लक्षात घेतल्या तर होईल ‘फायदा’, CBDT नं सूचित केले नवीन फॉर्म

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्राप्तिकर विभागाने सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी फॉर्म अधिसूचित केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी सहज (आयटीआर-1), फॉर्म (आयटीआर -2), फॉर्म (आयटीआर-3), फॉर्म सुगम (आयटीआर-4), फॉर्म (आयटीआर-5), फॉर्म (आयटीआर-6), फॉर्म (आयटीआर -7) आणि फॉर्म (आयटीआर-V) ला सूचित केले गेले आहे. कोविड -19 साथीच्या आजारामुळे विविध गोष्टींच्या मुदतीत होणाऱ्या वाढीचा लाभ देण्यासाठी विभागाने आर्थिक वर्ष 2019-20 च्या प्राप्तिकर परतावा फॉर्ममध्ये सुधारणा केली आहे. यापूर्वी सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली होती.

कर सवलत मिळविण्यासाठी तुम्ही अजूनही करू शकता गुंतवणूक

कोविड -19 मुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन लक्षात घेऊन करदात्यांना केंद्र सरकारने काही फायदे दिले आहेत. या प्रकरणात आयकर कायद्याचा कलम 80सी (एलआयसी, पीपीएफ, एनएससी इ), 80डी (मेडिक्लेम) आणि 80जी (देणगी) अंतर्गत मिळकत करात सूट मिळण्यासाठी गुंतवणूकीची आणि देयकाची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडे अद्याप कर बचत योजनांमध्ये गुंतवणूकीसाठी वेळ आहे.`

फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात घ्या

क्लियरटॅक्स (ClearTax) चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले की, ‘नवीन फॉर्ममध्ये एक स्वतंत्र सारणी देण्यात आली आहे, ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कर माफीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत बचत गुंतवणूक योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीची माहिती देऊ शकता. करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये त्यांच्या कर दायित्वाचे मूल्यांकन केले पाहिजे आणि 80सी अंतर्गत जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like