Income Tax Return | ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ भरत आहात का?, मग जाणून घ्या काय संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Income Tax Return | जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर तुमच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे बंधनकारक आहे. सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवला आहे. परंतु तत्ज्ञांनुसार, इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहू नये. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेवूयात.

ऑनलाइन भरावा लागेल ITR

टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट बळवंत जैन यांनी सांगितले की, सध्या 80 वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्व लोकांना ऑनलाइन आयटीआर दाखल करावा लागेल.

80 वर्षावरील सर्व व्यक्ती ऑनलाइनसह ऑफलाइन सुद्धा आयटीआर दाखल करू शकतात.

मात्र, रिफंड क्लेमसाठी सर्वांना ऑनलाइनच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करावा लागेल.

योग्य फॉर्मची निवड आवश्यक

जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणार असाल तर योग्य फॉर्मची निवड आवश्यक आहे. फॉर्म ऑनलाइन आणि डाऊनलोड करून सुद्धा भरू शकता. याशिवाय एखादा आणखी फॉर्म भरायचा असेल तर तो डाऊनलोड करून भरावा लागेल.

या वेबसाइटद्वारे भरा फॉर्म

1. तुम्ही www.incometaxindiaefiling.gov.in च्या द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करू शकता.

2. यासाठी ब्राउजरमध्ये www.incometaxindiaefiling.gov.in ओपन करा.

3. या वेबसाइटवर अकाऊंट असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्डसह लॉग-इन करा.

4. अकाउंट नसेल तर नवीन अकाऊंट तयार करा.

5. नंतर दिलेल्या निर्देशांच्या आधारावर माहिती भरून इन्कम टॅक्स रिटर्न भरा.

 

हे कागदपत्र ठेवा तयार

आयटीआर दाखल करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नसते. परंतु फॉर्म-16 आणि बँक स्टेटमेंट सारखे कागदपत्र तयार ठेवावो. सोबतच इन्व्हेस्टमेंटचे प्रुफसुद्धा तुमच्या जवळ ठेवा. यामुळे प्री-फिल्ड डेटा मिळण्यास मदत होईल.

व्हेरिफिकेशन आहे आवश्यक

फॉर्म भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करावे लागते. तुम्ही डिजिटल सिग्नेचर, आधार किंवा डिमॅट किंवा बँक ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन करू शकता. जर तुम्ही ही प्रक्रिया करता आली नाही तर आयटीआर एक्नॉलेजमेंटची प्रिंट आऊट काढा, त्यावर सही करा, आणि नंतर इन्कम टॅक्स विभागाद्वारे सांगितलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवून द्या.

Web Title : Income Tax Return | if your going to file income tax return then know the complete process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police | ‘ते’ 5 पोलीस संशयाच्या भोवऱ्यात, अंमली पदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्याची DCP कडून चौकशी

Kolhapur Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीला अटक

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,240 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी