Income ‘टॅक्स’ भरणं झालं आणखी ‘सोपं’, आता CA चीही आवश्यकता नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता नव्या टॅक्स स्लॅबमुळे तुम्हाला कमी कर भरावा लागेल.शिवाय आयकर रिटर्नसाठी देखील तुम्हाला सीएकडे जाण्याची गरज भासरणार नाही. पुढील वर्षीपासून नोकरदांना इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणं आणखी सोपं होईल. सध्या आयटीआरमध्ये कपात आणि सूट हे दोन्ही पहावे लागते. हे सगळं तपासण्यासाठी सीएची गरज असते. मात्र आता तशी गरज भासणार नाही.

कशी मोजायची टॅक्समधील सूट –
नव्या कर प्रणालीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले होते. यावर्षापासून नागरिकांना कर भरण्यासाठी दोन पर्याय असतील असे त्या म्हणाल्या. तुम्हाला सध्याची टॅक्स व्यवस्था हवी असेल तरीही ते शक्य आहे. नवी करव्यवस्था पहिल्या कर व्यवस्थेच्या तुलनेत सोपी आहे परंतु त्यासाठी पीपीएफ, इन्शुरन्स पॉलिसी यासारख्या गुंतवणुकीतून सूट मिळवण्याची गरज भासरणार नाही.

आकडेमोडीतून सुटका –
नव्या टॅक्स व्यवस्थेत आयटीआर भरणं सोपं होईल, कारण टॅक्समध्ये नेमकी किती सूट मिळेल याच्या आकडेमोडीत पडावं लागणार नाही. जर तुम्ही नव्या व्यवस्थेप्रमाणे टॅक्स भरायचा असेल तर आधीच भरलेला आयटीआर फॉर्म दिला जाईल.

महसूल सचिव अजय भूषण पांडेय म्हणाले की येत्या आर्थिक वर्षात 2019 -20 साठी टॅक्स रिटर्न दाखल करायचा असेल तर करदात्यांना दोन्ही पर्याय असतील.

नव्या कर प्रणालीनुसार आयटीआर भरायचा असेल तर ई फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. येथे पहिल्यापासूनच भरलेला फॉर्म तुम्हाला मिळेल. त्यामुळे हा फॉर्म भरणं सोपं आहे. परंतु तुम्हाला जर जुन्या प्रणालीनुसार आयटीआर भरायचा असेल तर जुना फॉर्म उपलब्ध असेल. यात ही माहिती आधीपासून भरलेली नसेल. आयकर विभागाने दरवर्षी 50 लाख रुपयांची कमाई करणाऱ्या पगारदार लोकांना ITR -1 (Sahaj) जारी केलेला आहे. यासह इतर श्रेणीसाठी देखील इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म जारी करण्यात आला आहे.