ITR दाखल केल्यानंतर ‘हे’ काम करणं खुप महत्वाचं, फक्त 3 दिवसांची संधी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – जर तुम्ही इनकम टॅक्स फाइल भरली आहे परंतु अद्याप आपण हे व्हेरिफाय केले नसेल, तर इनकम टॅक्स विभागाने आपल्याला एक सुवर्ण संधी दिली आहे. आयकर विभागाने 2015-16 ते 2019-20 या कालावधीत मुल्यांकन वर्षाची ई-रिटर्न्सची पडताळणी केली नाही अशा करदात्यांना एकवेळ सूट दिली आहे. म्हणून, करदाता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत त्यांच्या परताव्याची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. इलेक्ट्रॉनिक मोडशिवाय डिजिटल सिग्नेचर इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करणार्‍या करदात्यांना आयटीआर अपलोड झाल्यानंतर 120 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करावी लागेल.

आपण या प्रकारे व्हेरिफाय करू शकता
>> आधार ओटीपीद्वारे
>> नेट बँकिंगद्वारे ई-फाईल खात्यात लॉगिन करुन
>> इलेक्ट्रॉनिक व्हेरिफाय कोडद्वारे (ईव्हीसी)

आधार ओटीपीद्वारे पडताळणी कशी करावी
आधार ओटीपीच्या माध्यमातून, आपल्याला अधिकृत ई-फाइलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in वर भेट द्यावी लागेल. येथे पॅनला आधारशी जोडणे आवश्यक आहे. यानंतर ई-व्हेरिफाय लिंकवर क्लिक करा आणि बँक आधार ओटीपी पर्यायाचा वापर करून ई-व्हेरिफाय रिटर्न निवडा. आता ओटीपी जनरेट करा. ते आपल्या नोंदणीकृत मोबाइल फोनवर येईल. आता ई-फाइलिंग पोर्टलवर ओटीपी टाका आणि आता आपली व्हेरिफाय पूर्ण होईल.

नेट बँकिंगद्वारे एखादी व्यक्ती व्हेरिफाय करू शकते
प्रथम आपल्याला इंटरनेट बँकिंग खात्यात लॉग इन करावे लागेल. यानंतर, बँकेने प्रदान केलेल्या आयकर ई-फाईलिंग लिंकवर क्लिक करा. त्यानंतर परतावा पडताळणीसाठी ई-व्हेरिफाय लिंकवर क्लिक करा त्यानंतर व्हेरिफाय पुर्ण होईल.

इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोडद्वारे (ईव्हीसी)
आयकर रिटर्नची पडताळणी बँक एटीएममधून करता येईल. यासाठी तुम्हाला बँक एटीएमवर कार्ड स्वॅप करावे लागेल. ई-फाईलिंगसाठी पिन प्रविष्ट करा. आता नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर तुम्हाला ईव्हीसी (इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड) मिळेल. आता ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा आणि बँक एटीएम पर्यायाचा वापर करुन ई-सत्यापित रिटर्न निवडा. यानंतर, फोनमध्ये आढळलेली ईव्हीसी टाका यानंतर आपले व्हेरिफाय होईल