1 तासात 55,823 लोकांनी भरला ITR, तुम्हीपण 31 डिसेंबरपूर्वी करा दाखल, अन्यथा करावी लागेल भरपाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019-20 या आर्थिक वर्षासाठी तुमच्याकडे आयकर विवरणपत्र भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. आयकर भरणाऱ्या करदात्यांचा डेटा प्राप्तिकर विभागाने जाहीर केला आह, जर आपण अद्याप भरले नसेल तर 31 डिसेंबरपूर्वी कर भरा, अन्यथा पूर्ण दंड भरावा लागेल.

प्राप्तिकर विभागाने केले ट्विट
प्राप्तिकर विभागाकडून ट्वीट करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आज दुपारी 12 वाजेपर्यंत 1,46,812 आयटीआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अवघ्या एका तासात 55,823 परतावा दाखल झाला आहे. आयकर विभागाने अद्याप कर भरण्याची अंतिम तारीख वाढविली नाही.

26 डिसेंबर, 2020 पर्यंत 2020-21 या मूल्यांकन वर्षासाठी आतापर्यंत 4.15 कोटी आयटीआर दाखल करण्यात आल्या आहेत, प्राप्तिकर विभागाकडून दररोज कर भरणाऱ्यांचा डेटा जाहीर केला जातो. याद्वारे, लोकांना सांगितले जात आहे की ज्यांनी आपला कर भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर भरावा.

जर आपण ऑनलाईन टॅक्स भरणार असाल तर, आपल्याला ई-फाइलिंग वेबसाइटवर साइन इन करावे लागेल, परंतु यासाठी आपल्याकडे खाते असणे आवश्यक आहे. ऑनलाइन आयटीआर केवळ आयटीआर -1 आणि आयटीआर -4 साठी आहे.

1. आयकर ई-फाईलिंग पोर्टलवर जा आणि युजर आयडी (पॅन नंबर), पासवर्ड व कॅप्चा कोडसह लॉगिन करा.

2. ‘ई-फाईल’ मेनूवर क्लिक करा आणि नंतर ‘आयकर विवरण’ च्या लिंकवर क्लिक करा.

3. पॅन स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न पृष्ठावर भरलेले दिसेल.

4. आता मूल्यांकन वर्ष, आयटीआर फॉर्म क्रमांक, फाईलिंग प्रकारात ‘ओरिजिनल / रिव्हिज्ड रिटर्न’ निवडा. यानंतर सबमिशन मोडमधील ‘ प्रिपेयर अँड सबमिट ऑनलाईन’ वर क्लिक करा.

5. नंतर ‘Continue’ वर क्लिक करा. आता मार्गदर्शकतत्त्वे काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा.

6. फॉर्म भरल्यानंतर, ‘टॅक्स पेड अँड व्हेरिफिकेशन टॅब’ मध्ये योग्य पडताळणीचा पर्याय निवडा.

7. त्यानंतर ‘प्रीव्यू अँड सबमिट’ या बटणावर क्लिक करा.

8. जर आपण ‘ई-पडताळणी’ची निवड केली असेल तर आपण ईव्हीसी किंवा ओटीपीपैकी एकाद्वारे ई-सत्यापन पूर्ण करू शकता.

9. एकदा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की आपण आयटीआर सबमिट करू शकता.