Income Tax Rule | 26 मे पासून इन्कम टॅक्सच्या नियमात होत आहे मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा येऊ शकता अडचणीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Rule | तुम्हीही बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे व्यवहार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. उद्यापासून प्राप्तीकर विभाग एका मोठ्या नियमात बदल करत आहे. आता नवीन नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने कोणत्याही एका आर्थिक वर्षात बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रोख जमा केल्यास, त्याला पॅन (PAN) आणि आधार (Aadhaar) अनिवार्यपणे जमा करावे लागेल. (Income Tax Rule)

 

प्राप्तिकर (15th Aamendment) नियम, 2022 अंतर्गत, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने नवीन नियम जारी केले आहेत, जे उद्यापासून म्हणजेच 26 मे पासून लागू होणार आहेत. हा नियम अधिसूचित केला गेला आहे.

 

कधी आवश्यक असेल PAN-Aadhaar

जर एखाद्याने एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमध्ये 20 लाख रुपये रोख जमा केले तर त्याला पॅन-आधार जमा करावे लागेल.

एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील कोणत्याही एक किंवा जास्त खात्यांमधून 20 लाख रुपये काढण्यासाठी देखील पॅन-आधार लिंक करणे आवश्यक असेल.

तुम्ही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडले तरीही पॅन-आधार द्यावे लागेल.

जर एखाद्याने चालू खाते उघडले तर त्यासाठीही पॅन कार्ड अनिवार्य असेल. (Income Tax Rule)

जर एखाद्याचे बँक खाते आधीच पॅनशी जोडलेले असेल, तर तरीही त्याला व्यवहारांसाठी Pan Card लिंक करावे लागेल.

रोखीच्या व्यवहारांवर सरकारची नजर
वास्तविक, रोख रकमेची बनावटगिरी कमी करण्यासाठी आणि देखरेखीच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने हा निर्णय घेतला आहे.
प्राप्तीकर विभागाला लोकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती राहावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
आता आधार आणि पॅन जोडल्यामुळे जास्तीत जास्त लोक आयकराच्या कक्षेत येतील.
व्यवहारादरम्यान पॅन क्रमांक (PAN Number) असल्यास,
प्राप्तीकरकर विभाग (Income tax department) तुमच्यावर बारीक नजर ठेवेल.

 

Web Title :- Income Tax Rule | income tax new rule pan aadhaar mandatory for cash deposits or withdrawals above 20 lakh see here details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan eKYC | PM किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ! ‘हे’ काम लवकरच करा पूर्ण; अन्यथा होईल नुकसान, जाणून घ्या

 

Pune Missing Case | पत्नीची कदर करा… 3 वर्षाच्या मुलीसह 31 वर्षीय विवाहीता पुण्यातील घरातून ‘बेपत्ता’

 

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव