Income Tax Saving Tips | आई-वडिलांची सेवा केल्याने मिळतो मेवा ! जाणून घ्या काय सांगतो इन्कम टॅक्सचा ‘हा’ नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Saving Tips | आपल्या देशात आई – वडिलांची सेवा हा सर्वात मोठा धर्म मानला जातो. आई – वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. ’केली सेवा तर मिळेल मेवा’ ही म्हण आपल्याकडे आहे. ही केवळ एक म्हण नाही. पालकांच्या सेवेवर होणार्‍या खर्चावर कर सूट मिळू शकते, असे प्राप्तीकर विभागाचे म्हणणे आहे. (Income Tax Saving Tips)

 

आर्थिक वर्ष त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आपल्यापैकी बहुतेक जण वही खात्याचा हिशेब दुरुस्त करण्यात व्यस्त असतात. कर वाचवण्यासाठी लोक वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. टॅक्समध्ये बचत करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही कर वाचवू शकता तसेच तुमची बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता.

 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF), विमा पॉलिसी (Insurance), गृहकर्ज (Home Loan) आणि भाडे यासारख्या बाबींवर सूट मिळू शकते.

 

याशिवाय आणखी काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही कर वाचवू शकता. यामध्ये तुम्ही पालकांच्या नावे काही विमा योजना किंवा बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. ज्यांचे पालक कराच्या कक्षेबाहेर आहेत किंवा त्यांचे उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा (Taxable Income) कमी आहे अशा लोकांसाठी या पद्धती उपयुक्त आहेत. (Income Tax Saving Tips)

 

आई – वडिलांना द्या भेट (Gift To Parents)
करपात्र उत्पन्न तुमच्या पालकांना भेट म्हणून देऊ शकता. तुम्ही त्यांच्या नावावर गुंतवणूक करू शकता.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मूळ कर सवलत (Tax Exemption Limit) मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कराच्या कक्षेतून बाहेर येतात.

बँक किंवा पोस्ट ऑफिस डिपॉझिटवर मिळालेले 50,000 रुपयांपर्यंतचे व्याज हे ज्येष्ठ नागरिकांसाठी करमुक्त आहे.
तुमच्या पालकांचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असले तरीही तुम्ही त्यांच्या नावावर त्यांच्या कर स्लॅबनुसार गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकता.

पालकांना त्यांच्या मुलाकडून मिळालेली रोख भेट करमुक्त आहे.
आणि अशा गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न करपात्र उत्पन्नात जोडले जाणार नाही.

 

पालकांसाठी आरोग्य विमा (Health Insurance For Parents)

तुम्ही पालकांसाठी आरोग्य पॉलिसी खरेदी करू शकता. प्राप्तिकराच्या कलम 80D अंतर्गत, पालकांचे वय 60 वर्षांच्या आत असल्यास आरोग्य विम्यावर 25,000 रुपयांच्या कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
जर पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर कर सूट मर्यादा 50,000 रुपये आहे.

विशेष बाब म्हणजे करातील ही सूट कलम 80 डी अंतर्गत 25,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा वेगळी आहे.
कलम 80 डी अंतर्गत, तुम्ही तुमच्या स्वत:च्या कुटुंबासाठी आरोग्य विम्यावरील कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.

 

पालकांना भाडे देऊन एचआरएचा दावा करा (Claim HRA By Paying Rent To Parents)

तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुम्ही तुमच्या पालकांना भाडे देऊन कर वाचवू शकता.
लक्षात ठेवा की मालमत्ता पालकांच्या नावावर असावी. अशा प्रकारे तुम्ही भाड्याच्या आधारावर कर सूट मिळवू शकता.

 

अपंग आई – वडिलांची सेवा (Handicapped Parent Relief)

अपंग पालकांवर झालेल्या खर्चासाठी तुम्ही प्राप्तीकराचा दावा करू शकता.
आयकराच्या कलम 80DD अंतर्गत, जर एखाद्याचे पालक अपंग असतील तर ती व्यक्ती प्राप्तीकरात सूट घेऊ शकते.
40 टक्के अपंग पालकांना 75,000 रुपयांपर्यंतच्या खर्चावर करमाफीचा लाभ मिळतो.

जर कुटुंबात दोन भाऊ असतील, दोघेही आपल्या आई – वडिलांवर खर्च करत असतील, तर तुमचा खर्च किती आहे हे दिसेल.
जर दोन्ही भावांनी 75 – 75 हजार रुपये खर्च केले तर दोन्ही भाऊ प्राप्तीकरात सूट मागू शकतात.

 

Web Title :- Income Tax Saving Tips | income tax deductions for expenditure on parents tax saving tips last date of itr filing

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा