Income Tax Saving Tips | करबचत करण्याचे ‘हे’ आहेत प्रभावी मार्ग ! 10 लाख रूपयांवरही भरावा लागणार नाही टॅक्स, जाणून घ्या

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या महागाईच्या आणि अनिश्चिततेच्या काळात प्रत्येकाला पैसा (Money) जपून वापरणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उत्पन्नावरती टॅक्स (Income Tax Saving Tips) भरावाच लागतो. हा टॅक्स वाचवण्यासाठी अनेकजण काहीना काही पर्याय शोधत असतात. आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा टॅक्स (Income Tax Saving Tips) वाचवू शकता. जर तुमचं उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि तुम्हाला जर टॅक्स भरावा लागेल अशी भीती वाटत असले तर या टिप्सचा नक्कीच विचार करा. कारण 10 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या व्यक्ती इनकम टॅक्स स्लॅबमध्ये (Tax Slab) येतात.

 

मात्र हे लक्षात घ्या की सध्याच्या कर कायद्यांमध्ये (Tax Law) अशा अनेक तरतुदी (Provisions) आहे, ज्यांचा योग्य वापर करुन तुम्ही तुमचा टॅक्स (Income Tax Saving Tips) वाचवू शकता. कर तज्ज्ञांच्या मते, समजा तुम्ही वार्षिक 10 लाख रुपये कमावत असाल तर तुमचं 50 हजार रुपयांचे स्टॅन्डर्ड डिडक्शन (Standard Deduction) होतं. त्यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न 9.5 लाखांवर येते.

 

अशावेळी तुम्ही 80C अंतर्गत असलेल्या बचत योजनांमध्ये (Savings Plan) गुंतवणूक (Investment) करुन 1.5 लाखापर्यंत सूट मिळवू शकता. जीवन विमा (Life Insurance), सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY), मुलांचे शुल्क इत्यादी योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. असे केल्याने तुमचे करपात्र उत्पन्न 8 लाखांवर येते.

 

 

याशिवाय आणखी उत्पन्न कमी करण्यासाठी तुम्ही NPS चा लाभ देखील घेऊ शकता.
यामुळे करपात्र उत्पन्न आणखी 50 हजार रुपयांनी कमी होईल.
तसेच तुमच्या आरोग्य विम्याद्वारे (Health Insurance) 25 हजार रुपये आणि तुमच्या पालकांच्या आरोग्य विम्याद्वारे 25 हजार रुपयांची सूट मिळवू शकता.
यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न 7 लाखावर येईल.

 

आता यानंतर, जर तुम्ही गृहकर्ज (Home Loan) घेतले असेल तर तुम्ही त्याद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजात सूट मिळवू शकता.
आता तुमचे करपात्र उत्पन्न होईल 5 लाख रुपये.
मात्र 5 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर सरकार कलम 87(ए) अंतर्गत 12 हजार 500 रुपयांची कर सवलत देते.
त्यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाखाहूनही कमी होते. त्यामुळे तुम्हाला कर भरावा लागणार नाही. हे उत्पन्न कलम 87A अंतर्गत पूर्ण सूट मिळण्यास पात्र आहे.
त्यामुळे या गोष्टींचा वापर करुन तुम्ही तुमचा इनकम टॅक्स वाचवू शकता.

 

Web Title :- Income Tax Saving Tips | income tax saving tips how to save income tax on above 5 to 10 lakh rupees income

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा