Budget 2020 : नोकरदारांना मोठा झटका, आता PF कपात झाल्यानंतर देखील नाही वाचणार Income Tax

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान सरकारने नवा इनकम टॅक्स स्लॅब आणला आहे. त्यात करदात्यांना टॅक्स देण्यासाठीचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय आहे, ज्यात 5, 20 आणि 30 टक्के असे टॅक्स स्लॅब आहेत. यंदा 5, 10, 15, 20, 25 आणि 30 टक्के स्लॅबचे 6 टॅक्स स्लॅब आहेत. नव्या टॅक्स स्लॅबचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अनेक सवलती सोडाव्या लागतील.

80 सी आणि 80 डी अंतर्गत मिळणारी टॅक्स सूट बंद –
नव्या व्यवस्थेंतर्गत जर तुम्ही एम्प्लाॅयी प्रोव्हीडंट फंड (पीएफ) देत आहेत. तर तुम्हाला 80 सी अंतर्गत टॅक्समध्ये कोणताही दिलासा मिळणार नाही. सरकारने नव्या व्यवस्थेंतर्गत टॅक्स सूट मिळण्यासाठी फायदा घेण्याच्या अनेक अटी लावल्या आहेत. यानुसार फायदा घेण्यासाठी 80 सी आणि 80 डी अंतर्गत मिळणाऱ्या अनेक सवलती सोडाव्या लागतील. नव्या टॅक्स सिस्टममधील सर्वात मोठी आणि कठोर अट आहे की ही सवलत सोडावी लागेल. नव्या टॅक्स सिस्टममध्ये इनकम टॅक्स सेक्शन 80 सी, 80 डी, 24 अंतर्गत मिळणाऱ्या सूटीचा फायदा बंद होईल.

या योजनेत गुंतवणूकीचा लाभ मिळणार नाही –
उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि नवी टॅक्स व्यवस्था निवडत असाल तर तुम्हाला 80 सी अंतर्गत LIC, PPF, NSC, यूलिप, ट्यूशन शुल्क, म्यूचुअल फंड ELSS, गृहकर्ज, पेंशन फंड, बँक टर्म डिपॉजिट, पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी डिपॉजिट आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने टॅक्स सूटचा फायदा मिळणार नाही. तसेच 80 डी अंतर्गत इंश्योरंसवर टॅक्स सूटचा लाभ घेता येणार नाही. नव्या योजनेत सूटीचा फायदा सोडावा लागणार असल्याने करदाते बचतीसाठी विमा खरेदी करणार नाहीत.

गुंतवणूक न करणाऱ्यांना मोठा फायदा –
नव्या व्यवस्थेचा फायदा फक्त त्या लोकांना होईल ज्यांनी कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक केली नाही. नव्या टॅक्स नुसार 5 लाखापर्यंत उत्पन्न असल्यास कर भरण्याची गरज नाही. परंतु त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास कर भरावा लागेल. 5,00,001 ते 7.5 लाख उत्पन्न असल्यास 10 टक्के कर, 10 ते 12.5 लाख उत्पन्न असल्यास 20 टक्के कर, 12.5 ते 15 लाख उत्पन्न असल्यास 25 टक्के कर आणि 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30 टक्के कर द्यावा लागेल.