अर्थसंकल्प 2020 : इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये होऊ शकतो मोठा बदल ! 20 लाखापर्यंत कमविणार्‍यांना होणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला पुढील आर्थिक वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो. कारण 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री आयकरात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मागील काही दिवसात अनेकदा आयकरात कपातीचे संकेत दिले आहेत. यावर अर्थमंत्री म्हणाल्या की आयकराला आधिक तर्कसंगत बनवण्यासाठी अन्य उपायांवर विचार केला जाईल.

असा असू शकतो नवा इनकम टॅक्स स्लॅब –
सूत्रांच्या मते वर्षाला 7 लाख पर्यंत उत्पन्न कमावणाऱ्यांवर 5 टक्के टॅक्सचा प्रस्ताव आहे. सध्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर लागतो. तर 7 ते 10 किंवा 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यावर 10 टक्के टॅक्सचा प्रस्ताव आहे. सध्या 50 ते 10 लाख रुपयांच्या कमाईवर 20 टक्के टॅक्स लागतो.

10 ते 20 लाख रुपये उत्पन्नावर 20 टक्के टॅक्सचा प्रस्ताव आहे. सध्या 10 लाखावर 30 टक्के टॅक्स लागतो. 20 लाख ते 10 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्सचा प्रस्ताव आहे. याशिवाय 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाईवर 35 टक्के टॅक्सचा प्रस्ताव आहे.

सध्याच्या टॅक्स स्लॅबनुसार कोणत्याही व्यक्तीला वार्षिक उत्पन्नाच्या 2.5 लाख रुपये आधिक असेल तर ते टॅक्स भरावा लागेल. जर व्यक्ती नोकरीदार असेल तर त्याच्या वेतनातून टॅक्स कापला जातो.

याशिवाय अन्य स्त्रोतांद्वारे होणारी कमाई देखील आयकराच्या अंतर्गत येते. यात बचतीवर व्याज, भाडे, व्यवसाय याचा समावेश आहे. परंतु काही स्त्रोत असे ही आहेत जेथून तुमची कमाई होईल त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा –