Income Tax | करदात्यांना मोठा दिलासा ! आता 15 ऑगस्टपर्यंत भरू शकता फॉर्म 15CA/15CB

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax News | टॅक्सपेयर्ससाठी (taxpayers) दिलासादायक बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा टॅक्स भरण्याच्या अखेरच्या तारखेबाबत त्रस्त असाल तर आता तुमचे टेन्शन थोडे कमी झाले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने फॉर्म 15CA/15CB मॅन्युअली (Income Tax) भरण्याची डेडलाइन वाढवली आहे.

आता तुम्ही 15 ऑगस्ट 2021 पर्यंत तो भरू शकता. तर, अगोदर यासाठी शेवटची तारीख 15 जुलै 2021 होती. इन्कम टॅक्स विभागाकडून लाँच करण्यात आलेल्या पोर्टलमध्ये येत असलेल्या समस्येमुळे याची शेवटची तारीख वाढवली आहे.

इन्कम टॅक्स विभागाचे नवीन पोर्टल 7 जूनपासून सुरू केले होते. यानंतर लागोपाठ टॅक्सपेयर्सला समस्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यानंतर विभागने अखेरची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला.

आयकर अधिनियम 1961 (Income Tax Act 1961) च्या नुसार,
फॉर्म 115CA/15CB इन्कम टॅक्स पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फाईल करणे आवश्यक आहे.
फॉर्म 15CA रेमिटर द्वारे या गोष्टीचे डिक्लरेशन असते की,
नॉन-रेसिडेंटना केलेल्या पेमेंटच्या प्रकरणात सोर्सवर टॅक्स डिडक्ट झाला आहे,
परंतु फॉर्म 15CB सीए द्वारे सादर करण्यात येणारे यागोष्टीचे सर्टिफिकेट आहे
की ओव्हरसीज पेमेंट करताना प्रासंगिक कर संधी आणि आयटी अ‍ॅक्टच्या तरतूदीचे पालन केले गेले आहे.

Web Title :- Income Tax | taxpayers got relief now you can fill 15ca 15cb form till 15 august 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला