बदलला इन्कम टॅक्सशी संबंधीत ‘हा’ फॉर्म, आता सरकारला सहज मिळेल तुमच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सीबीडीटी म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने म्हटले आहे की, या वर्षापासून करदात्यांना एक चांगला फॉर्म 26 एएस दिसून येईल, जो टेक्सपेयर्सचे फायनान्शियल ट्रांजक्शनवर जास्त डिटेल देईल. सीबीडीटीने एका वक्तव्यात म्हटले आहे की, नवा फॉर्म 26एएस टॅक्सपेयर्सच्या आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नला लवकर आणि योग्य पद्धतीने ई-फाइल करण्यात मदत करेल. सीबीडीटी म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने नुकताच फॉर्म 26एएस नव्या दुरूस्तीसह अधिसूचित केला आहे. हा तुमचा वार्षिक टॅक्स स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या पॅन नंबरच्या मदतीने यास इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवरून काढू शकता. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नावर टॅक्स भरला असेल किंवा तुम्हाला झालेल्या एखाद्या कमाईवर एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने टॅक्स कापला आहे, तर त्याचा उल्लेख सुद्धा तुम्हाला फॉर्म 26एएस मध्ये दिसून येईल.

आता काय झाले –

टॅक्स एक्सपर्ट सांगतात की, यापूर्वी या फॉर्मला अ‍ॅन्युल टॅक्स फॉर्म म्हणत असत. आता यास अन्युअल इन्फॉर्मेशन फॉर्म म्हटले जाते. आता यामध्ये एक टॅक्सपेयर्सची सर्व फायनान्शियल माहिती असेल. शेयरची खरेदी, म्युचूअल फंडमध्ये गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीच्या व्यवहाराची सर्व माहिती यामध्ये असेल.

जाणून घ्या फॉर्म 26एएस –

फॉर्म 26एएसमध्ये तुम्ही सरकारला भरलेला कर तसेच जर तुम्ही जास्त टॅक्स भरला असेल तर त्याचे रिफंड फाइल करायचे असेल तर याचा उल्लेख यामध्ये असतो. जर तुम्हाला एखाद्या आर्थिक वर्षात आयकर रिफंड मिळाला आहे तर त्याचीही माहिती असेल. कर्मचारी म्हणून तुम्हाला वेळोवेळी ट्रेसेसच्या वेबसाइटवर फॉर्म 26एएस चेक करण्याची जरूरत आहे. जर तुमच्या टीडीएसमधून पॅन नंबर जोडलेला आहे तर तुम्ही या वेबसाईटवर टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट पाहू शकता. ट्रेसेसच्या वेबसाइटवर ही सुविधा मोफत उपलब्ध आहे.

इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवरून करू शकता फॉर्म 26एएस डाऊनलोड

एक्सपर्ट म्हणतात, इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला फॉर्म 26एएस, फॉर्म 16 आणि फॉर्म 16ए लक्षपूर्वक तपासण्याची गरज आहे. जर सर्वकाही ठिक आहे. तेव्हाच तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करा.

तुम्ही फॉर्म 26एएस ला ट्रेसेसच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता. फॉर्म 26एएस डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स फायलिंगच्या वेबसाईटवर लॉग इन करा.

माय अकाऊंट सेक्शनमध्ये तुम्ही व्ह्यू फॉर्म 26एएस (टॅक्स क्रेडिट) टॅबवर क्लिक करा. यानंतर तुम्ही ट्रेसेसच्या वेबसाइटवर पोहचाल.

येथे तुम्ही असेसमेंट इयर टाकल्यानंतर स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता. तुमचा जन्म दिवस फॉर्म 26एएस उघडण्यासाठी पासवर्डप्रमाणे वापरला जातो.