पूर्ण झोप न घेतल्याने होऊ शकतात ‘या’ 6 समस्या ! वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

नवी दिल्ली : निरोगी जीवनशैलीसाठी जेवढी महत्वाची भूमिका आहाराची आणि व्यायामाची असते, तेवढीच आवश्यक झोप सुद्धा असते. तज्ज्ञांनुसार, निरोगी शरीरासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान 8 तासांची झोप आवश्य घेतली पाहिजे. परंतु या तंत्रज्ञानाच्या जगात व्यक्तीची पूर्ण दिनचर्याच बिघडून गेली आहे. झोप पूर्ण न होणे मनुष्यासाठी किती समस्या निर्माण करू शकते, याचा कदाचित तुम्हाला अंदाजही नसेल. याबाबत जाणून घेवूयात…

1 तणाव, राग आणि डिप्रेशन
झोप पूर्ण न झाल्याने मेंदूला आराम मिळत नाही. यामुळे तणाव वाढतो. राग, इरिटेशन आणि डिप्रेशनसारख्या समस्या सुरू होतात.

2 हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम
योग्य झोपेअभावी शरीरातील मेटाबॉलिज्म रेट प्रभावित होतो. यामुळे शरीरात चरबी वाढू लागते. हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हाय बीपी, डायबिटीज आणि हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो.

3 इम्यून सिस्टम होते कमजोर
कोरोना काळात इम्यून सिस्टम मजबूत बनवण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु हे जाणून घेतले तर तुम्ही हैराण व्हाल की पूर्ण झोप न घेतल्याने सुद्धा रोगप्रतिकार शक्ती प्रभावित होते आणि व्यक्तीला कोणतेही इंन्फेक्शन, खोकला, ताप, खोकला लवकर होतो.

4 ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क
झोप पूर्ण न झाल्याने पेशींचे खुप नुकसान होते, ज्यामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.

5 हार्मोनल समस्या
झोप पूर्ण न मिळाल्यास स्ट्रेस वाढतो, यामुळे हार्मोन असंतुलित होतात आणि चिडचिडेपणा, मूड स्विंग, पीरियडची अनियमितता, लठ्ठपणा अशा समस्या होतात.

6 निर्णय घेण्याची क्षमता होते कमजोर
अपूर्ण झोप घेतल्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो आणि व्यक्ती रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी विसरू लागते. यामुळे त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते. ज्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो.