मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचं प्रकरण : रिपब्लिक चॅनेलच्या अडचणीत वाढ, कर्मचार्‍यांविरूध्द FIR दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामीकारक ( defaming-mumbai-police )बातमी प्रसिध्द केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलीसाच्या सोशल मिडिया लॅबकडून रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) वार्ताहर, अ‍ॅकर आणि चॅनेलच्या अधिका-या विरोधात ना. म जोशी मार्ग पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅकर आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक शिवानी गुप्ता, उपसंपादक सागरिका मित्र, उपसंपादक सावन सेन, कार्यकारी संपादक नारायण स्वामी आणि संपादकीय कर्मचारी, तसेच न्युजरुम प्रभारी यांच्या विरोधात त गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मिडिया लॅबमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पवार हे कार्यरत असताना बिगेस्ट न्युज टू नाईट या मथळ्याखाली रिपब्लिक टीव्हीने 22 ऑक्टोंबरला एक वृत्त प्रसारीत केले होते. त्यात इतर तपास अधिकारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात नकारात्मक प्रतिमा तयार केली होती. या वृत्तामुळे मुंबई पोलीस दलाची विश्वासार्हता कमी केल्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आल्यावरून पवार यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे.