Lockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या ‘ट्रस्ट सेल’चा धक्कादायक खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील दीड वर्षापासून लॉकडाऊन Lockdown करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना (employees) वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्यास सांगितले. याचा परिणाम पती 24 तास घरात असल्याने पती-पत्नीमध्ये (Husband Wife Hassle) किरकोळ कारणावरुन खटके उडत आहेत. त्यामुळे कौटुंबीक हिंसाचाराच्या (Increase domestic violence case) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात पत्नीवर नाहीतर पतीवर जास्त अत्याचार झाल्याचा खुलासा पुणे पोलिसांच्या (Pune Police) ‘ट्रस सेल’ने (Truss cell) केला आहे.

Maratha reservation | ‘उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप’ – विनायक मेटे

दीड वर्षात 3 हजाराहून अधिक तक्रारी

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षात तीन हजाराहून अधिक घरगुती वादाच्या (Domestic disputes) तक्रारी (Complaints) दाखल झाल्या आहेत, अशी माहिती ट्रस्ट सेलच्या प्रमुख सुजाता शामने (Sujata Shamne) यांनी दिली.
दाखल झालेल्या तक्रारीमध्ये बहुतांश प्रकरणं ही मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाची आहेत.
काही तक्रारींमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भांडण झाल्यानंतर त्यांच्या बायका मुलांना घेऊन माहेरी गेल्या आहेत.
परंतु त्या अद्याप परत आल्या नाहीत, त्यामुळे पुरुषांना मानसिक त्रासाला (Mental distress) सामोरे जावे लागत आहे.

Ajit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…

पुरुषांच्या तक्रारीत वाढ

सुजाता शामने यांनी सांगितले की, मागील दीड वर्षात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा छळ झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
24 तास बंद खोलीत एकटं राहिल्याने पती-पत्नीमध्ये मानसिक तणाव (Mental stress) वाढला आहे. छोट्या छोट्या कारणांवरुन दोघांमध्ये वाद होत आहेत.
अशा लोकांना फोनवरुन किंवा ऑनलाईन समुपदेशन (Online counseling) करुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द ‘मोक्का’

पुरुषांवरील अत्याचारांची संख्या वाढली

लॉकडाऊनपूर्वी एका वर्षात 1283 जणांनी पुणे पोलिसांच्या ट्रस्ट सेलकडे कौटुंबिक वादाच्या तक्रारी केल्या आहेत. यामध्ये 791 तक्रारी या महिलांनी केल्या आहेत. तर केवळ 252 तक्रारी पुरुषांनी केल्या आहेत.
परंतु मागील 15 महिन्यांच्या कालावधीत घरगुती हिंसाचाराची संख्या वाढली आहे.
दीड वर्षात 3075 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी 1540 महिलांनी तर 1535 पुरुषांनी केल्या आहेत.
दीड वर्षात पुरुषांवरील अत्याचारांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे.

Spa Center in wakad and baner pune | वाकड, बाणेरमधील स्पाच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश; 2 जणांना अटक 5 महिलांची सुटका Lockdown