गोवा : भाजपच्या अडचणीत वाढ ; ‘मगोप’ने मागितली तीन मंत्रीपद

पणजी : गोवा वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे त्यांच्या राहत्या घरी काल दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर गोव्यात सत्ता संघर्षाला उधाण आले आहे. मुख्यमंत्री पदावर जो व्यक्ती विराजमान होईल त्या व्यक्तीने आमच्या तीन आमदारांना मंत्री पदाचे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने छोट्या पक्षांना एकत्रित घेऊन गोव्यात भाजपचे सरकार स्थापन केले होते. छोट्या पक्षांच्या मागणी नुसार गोव्याचे मुख्यमंत्रीपद मनोहर पर्रीकर यांच्याकडे देण्यात आले होते. तेव्हा त्यांनी संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारले होते. पर्रीकरांच्या प्रकृतीत झालेल्या बिघाडाचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरु केला होता. आज तागायत काँग्रेसचा प्रयत्न सुरूच आहे. मी गोव्यातून जाण्याआधी मुख्यमंत्री पदाचापेच सुटावा अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

गोवा विधानसभेत एकूण जागा या ४० आहेत. मात्र सध्या ४ जागा या रिक्त आहेत. भाजपकडे सध्या १२ सदस्य आहेत. काँग्रेसकडे १५ सदस्य आहेत. तर इतर पक्षांकडे ९ सदस्य आहेत. त्या ९ सदस्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्याच पक्षांनी मंत्रीपदे मागून भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी चांगलीच रस्सी खेच सुरु आहे.