मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ; पुन्हा नवीन गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

शिक्रापूर : पोलीसनामा ऑलाइन – पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) पोलीस कोठडीत असताना आता पुन्हा त्यांच्यासह दोन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगलदास विठ्ठल बांदल (Mangaldas Bandal), गुलाब दशरथ पवार (दोघे रा. शिक्रापूर) व दिनेश जयसिंग कामठे (रा. जातेगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शिक्रापूर पोलीसांनी बांदल यांना यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यात अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असताना, आता जातेगाव बुद्रुक येथील रवींद्र सातपुते यांना शिवाजीराव भोसले बँकेबाबत काहीही माहिती नसताना मंगलदास बांदल, गुलाब पवार व दिनेश कामठे यांनी सातपुते यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रांचा वापर करून सातपुते यांच्या खोट्या सह्या करून बँकेचे कर्ज काढले.

मात्र, कर्ज काढल्यानंतर अनेक दिवसांनी सातपुते यांना माहिती झाले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने व शिक्रापूर पोलीसांनी कोणाची फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन केले असल्याने, सातपुते यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

 

Also Read This : 

 

 

शिल्पा शेट्टी च्या ‘या’ ड्रिंकमध्ये लपलंय पोटाच्या प्रत्येक समस्येचं समाधान, ‘फॅट बर्न’ करण्यासाठी होईल मदत, जाणून घ्या

 

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

 

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

 

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या