गणेशोत्सवादरम्यान शहरात चोरट्यांचा सुळसुळाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहराच्या विविध भागांत पाच घरफोड्या झाल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांपैकी चार घरफोड्या या भरदिवसा झाल्या आहेत. यात सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या भक्तांचे महागडे मोबाईल आणि महिलांच्या पर्स चोरीच्या घटना घडल्या आहेत. गणेशोत्सव काळात चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तरीदेखील चोरट्यांकडून नागरिकांचे मोबाईल पर्स चोरी करीत आहेत.
[amazon_link asins=’B002U1ZBG0,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’380f11ae-bc05-11e8-9485-b36cba16c261′]

धनकवडी येथील मराठा सोसायटीतील डिंबळे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अजय मोहन बोरुडे (वय ३४) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी चोरी केली. ही घटना सोमवारी दुपारी १२ ते सव्वादोन या दरम्यान घडली. यात पाच लाख नऊ हजार रुपये रोख आणि सहा हजार २५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख १५ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. या प्रकरणी बोरूडे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिंगरेनगरला दोन फ्लॅट फोडले
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टिंगरेनगर येथील हरिओम अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० च्या दरम्यान दोन प्लॅट फोडण्यात आले. यात १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि आठ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६२ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरण्यात आला. या प्रकरणी तनुमय दासगुप्ता (वय ३१, रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा खुर्दमधील मॉडर्न तेहजीब अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करून बेडरुममधील कपाटातून ७४ हजार रुपये रोख रक्कम आणि नऊ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरले. हा प्रकार सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत घडला. या प्रकरणी हकिमुद्दीन सालेभाई भारमल (३२, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून घरात भरलेला आणि रिकामा असे प्रत्येकी एक गॅस सिलेंडर चोरण्यात आले. या प्रकरणी सतीश वसंत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B077B3MXKW,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed931d91-bc05-11e8-b294-67df04573346′]

कंपनीच्या ऑफिसमधून कम्प्युटर चोरी
खडीमशीन-उंड्री पिसोळी रस्त्यावर धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या व्हीटीपी ग्रुप कंपनीच्या दोन बंद ऑफिसच्या मागील बाजूच्या ‘स्लायडिंग विंडो’ उघडून चोरट्यांनी कम्प्युटर, यूपीएस आणि दोन लॅपटॉप चोरून नेले. या प्रकरणी साबीर अब्दुल रेहमान (३२, रा. कोंढवा) यांनी सोमवारी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तुळशीबाग परिसरातून पर्सची चोरी
पती व मुलांसमवेत गणपतीचा देखावा पाहत असताना चोरट्यांनी महिलेची छोटी पर्स चोरुन नेली. पर्समध्ये पाच हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे होती. चोरट्यांनी पर्समधील डायरीतील एटीएमचा पीन घेऊन एटीएममधून ४७ हजार रुपये काढले. ही घटना सोमवारी तुळशीबाग गणपती मंदीर परिसरात रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक ए.जी. मराठे तपास करीत आहेत.
[amazon_link asins=’B0002E3MP4,B00O45B0HO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’641c88d3-bc05-11e8-bc26-e30710d90493′]

मोबाईल चोरीकरणारा अटकेत
दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा १० हजार रुपये किंमतीच्या मोबाईलची चोरी झाली. चोरट्याने दर्शन घेत असताना तरुणाच्या खिशातून मोबाईल चोरला. वीश्रामबाग पोलिसांनी रामु रत्नप्पा चव्हाण (वय-२३ रा. मुपो. माचारपुर तांडे, ता. कर्लघटगी, जि. धारवाड, कर्नाटक) याला अटक केली आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.