थेऊर व परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – थेऊर व परिसरातील आसपासच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू दिसून येत असून कोलवडी पाठोपाठ थेऊर मध्ये दोन कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे.

कोरोना महामारीचे संकट पुन्हा गडद होताना दिसत असून नागरिकांचा बेफिकीरपणा कोरोनाच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे विदर्भातील परिस्थिती गंभीर बनत असताना पश्चिम महाराष्ट्रात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती आणखी नियंत्रणात असली तरीही रुग्णाची होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे.

हवेलीत कोरोना रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे आज पर्यंत पूर्व भागातील लोणी काळभोर (९ ) कदमवाकवस्ती (१९) मांजरी बु (१८) कुंजीरवाडी (५) उरुळी कांचन आळंदी म्हातोबा २ सोरतापवाडी (२) या पाठोपाठ वाघोली (८४) कोलवडी (१४) या गावात रुग्ण वाढत आहेत. अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर मध्ये सध्या दोन रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यांत एकही रुग्ण नव्हता परंतु नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा कोरोनाला आमंत्रण देतो आहे.

नागरिकांनी त्रिसूत्रीची अमलबजावणी केली तर या संकटावर मात करता येईल तरीही शासकीय यंत्रणांनी कडक नियम पाळण्याच्या सूचना देऊन दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.