अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी आज अंगणवाडी सेविकांशी ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे संवाद साधला.  यादरम्यान मोदींनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीची ही खुशखबर दिली. विशेष म्हणजे मानधनवाढ पुढच्या महिन्यापासूनच लागू होणार आहे. जवळपास १४ लाखांपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना याचा लाभ होणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या सहाय्यकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत मोफत विमा कवचही मिळणार आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bde6ce63-b5e8-11e8-8899-c9d48c37cf6b’]

ज्या अंगणवाडी सेविकांना सध्या ३ हजार रुपये मानधन मिळतं, त्यांना आता ४ हजार ५०० रुपये मिळतील. तर ज्या सेविकांचं मानधन २२५० रुपये आहे, त्यांचं ३५०० रुपये होईल. अंगणवाडी सहाय्यकांना १५०० ऐवजी २२०० रुपये मिळतील, अशी घोषण पंतप्रधान मोदींनी केली.

अंगणवाडी सेविकांचं कौतुक करताना  मोदी म्हणाले , “देवाकडे हजारो हात असतात. म्हणजे देवाच्या शरिराला हात असतात असं नाही, तर त्यांच्यातर्फे काम करणारे अनेक लोक असतात. तुम्ही-अंगणवाडीसेविका माझे हात आहात. पोषणाचा थेट संबंध स्वास्थ्याशी आहे. त्यामुळे आमच्या सरकारने  राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केली आहे. हे आमच्यासाठी मोठं मिशन आहे. त्यासाठी आशा आणि अंगणवाडीसेविकांची भूमिका महत्त्वाची आहे.”
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3594e7f-b5e8-11e8-9310-db884b843fbb’]

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात  राज्यातील अंगणवाडी कर्मचारी महिलांनी मानधन वाढीसाठी संप पुकारला होता  तसेच आझाद मैदानावर निदर्शनेही केली होती.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी