नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ

दिल्ली : वृत्तसंस्था – २००२ साली झालेल्या गोध्रा जळीत कांडानंतर उसळलेल्या दंगली बाबत सर्वोच्च न्यायालयात १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. या प्रकरणी असलेले आरोपी  नरेंद्र मोदी आणि इतरांच्यावर एसआयटीने दिलेली क्लिन चिट गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. त्यावर झकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायायालयात आवाहन दिले होते त्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या न्यायपीठातील न्यायाधीश न्या. ए एम खानविलकर यांनी पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होईल असे सांगितले.

५ नोव्हेंबर २०१७ रोजी गुजरात उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी या प्रकरणी पुन्हा चैकशी होणार नाही असे सांगितले होते.झकिया जाफरी यांनी तपासात मोठा कट शिजत असल्याचे म्हणले होते. त्यावर आपण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जावे असा सल्ला न्यायमूर्तींनी दिला होता. त्यानुसार झकिया जाफरी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. याच खटला संदर्भात आज सुनावणी घेण्यात आली होती.

२००२साली झालेल्या गोध्रा दंगलीतील हत्याकांडाच्या चौकशी संदर्भात नेमण्यात आलेल्या एसआयटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांना या प्रकरणी क्लीन चिट दिली होती त्याला  झकिया जाफरी यांनी गुजरात उच्च न्यायालयात आवाहन दिले होते. त्यानंतर  २०१७ मध्ये  एसआयटीने दिलेली क्लीन चिट कायम ठेवत या प्रकरणात मध्ये या पुढे कसलीही चौकशी केली जाणार नाही असे गुजरात उच्च न्यायालयाने सांगितले. या निर्णयाच्या विरोधात  झकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. त्यावरच  आता १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. झकिया जाफरी या दिवंगत माजी खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी असून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या  तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था सिटीजन फॉर जस्टिस अँड पीसच्या माध्यमातून गोध्रा दंगली बाबत क्लीन चिट देणे चुकीचे असल्याचे सांगत या मागे मोठे षडयंत्र असल्याचे म्हणले होते. वरील दोन व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मोदींच्या विरोधातील खटला लढवला जात आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीचा निकाल काय लागतो याकडे बघणे महत्वाचे असणार आहे. तसेच या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.