मनपाची चांगली वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीसह अन्य संकलित कराची जास्‍तीत जास्‍त ९० टक्‍क्‍यापर्यंत वसुली झाली तर संबंधित प्रत्‍येक कर्मचाऱ्याचा सत्‍कार करण्‍यात येईल. बक्षीस व वेतनवाढ देण्‍यात येईल, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जाहिर केले आहे.

प्रभाग १ व प्रभाग २ या समित्यांच्या वसुलीचा आढावा घेऊन सध्याची १५ ते २० टक्क्यांची वसुली येत्या १५ दिवसांत किमान ५० टक्क्यापर्यंत नेण्याचे आदेशही त्यांनी दिले. महापालिकेची संकलित कराची मागील थकित रक्कम १७९ कोटींची असून, त्यात यंदाच्या चालू मागणीचे ४३ कोटी ४६ लाख रुपये मिळून यंदाची एकूण मागणी २२२ कोटी ४७ लाखाची आहे. यापैकी मे २०१९ अखेरीपर्यंत १७ कोटी ६६ लाख रुपये वसूल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर महापौर वाकळे यांनी सावेडी प्रभाग १ व शहर प्रभाग २ समित्यांच्या अधिकाऱ्यांची वसुली आढावा बैठक घेतली. उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्‍त सुनील पवार, माजी नगरसेवक नितीन शेलार, सूरज शळके, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर व अंबादास सोनवणे, करमूल्य निर्धारण अधिकारी झिने आदी उपस्थित होते.

‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई!

शहर वसुली विभागात १४ कर्मचारी असताना वसुलीचे प्रमाण १८ ते २० टक्क्यांपर्यंत असल्याची खंत व्यक्त करून महापौर वाकळेंनी प्रत्‍येक कर्मचाऱ्याने ५० टक्क्यांपर्यंत वसुली येत्‍या १५ दिवसांमध्‍ये नागरिकांना मालमत्ता बिले देऊन केली पाहिजे. ज्‍या कर्मचाऱ्याची वसुली ५० टक्‍के होणार नाही, त्‍यांना लेखी नोटीस देऊन त्‍यांच्‍यावर उपायुक्‍तांनी तातडीने कारवाई करावी, असेही महापौर वाकळे यांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त – 

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

You might also like