खुशखबर ! ‘MPSC’ राज्यसेवेच्या जागांमध्ये वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जागांमध्ये ९९ जागांची वाढ करण्यात आली आहे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखत व निवड अशी प्रक्रिया पार पडणार आहे.

आयोगामार्फत डिसेंबर २०१८ मध्ये निघालेल्या जाहिरातीनुसार एकूण ११ संवर्गातील ३४२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये ही पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला या पदसंख्येत ३४२ वरून ४२४ पर्यंत वाढ करण्यात आली. त्यांनतर आज पुन्हा पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण १७ संवर्गातील ४३१ पदसंख्येसाठी ही भरती होणार आहे. यात भूमी अभिलेख उप अधीक्षक (गट – ब) संवर्गातील सात पदे समाविष्ट केले आहे. त्यासंदर्भातील घोषणापत्र आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पदाचे नाव व संख्या

उप जिल्हाधिकारी- ४०
पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त – ३१
स हायक राज्यकर आयुक्त – १२
उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी -२१
राज्य वित्त व लेखा सेवा सहायक संचालक – १६
उद्योग उपसंचालक -६
तहसीलदार -७७
उपशिक्षणाधिकारी -२२
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी -३
कक्ष अधिकारी -१६
सहायक गट विकास अधिकारी -११
भूमी अभिलेख उपअधीक्षक -७
राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक- १०
सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क -१
उद्योग अधिकारी -३७
सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम -५
नायब तहसीलदार पदासाठी -११३