शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सीएससी केंद्राची संख्या वाढवावी, राज्य सरकारकडे महाराष्ट्र बसव परिषद नांदेड यांची मागणी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खरीप हंगामाच्या पिकाच्या पिकविमा भरण्यासाठी मोठ्या अडचणी सामना शेतकऱ्यांना करावा लागतं आहेत, सध्या 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत वाढवावी तसेच सीएससी केंद्राची संख्या वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडे अविनाश अनेराये महाराष्ट्र बसव परिषद जिल्हा संपर्क प्रमुख नांदेड
यांनी केली आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वत्र थैमान घातले असून, आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी भयभीत झालेला आहे. अशा परिस्थितीत बँकांसमोर पीकविमा भरण्यासाठी होत असलेली गर्दी टाळण्यासाठी पिकविमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी आणि शेतकऱ्यांचा पिकविमा भरून घेण्याबाबत प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करून नियोजन करण्यात यावे, तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये सीएससी केंद्राची स्थापना करावी, पिकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिकविमा भरून होणारी गर्दी कमी करावी अशी मागणीही यावेळी अविनाश अनेराये यांनी केली आहे.