पोलीस भरतीमधील पद संख्या वाढवा ; युवा सेनेचा इशारा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बेरोजगारी हटवावी, पोलीस भरती करावी, सर्वच शासकीय परीक्षांचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी युवा सेनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात वाढत्या बेरोजगारीमुळे तुरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पोलीस व इतर शासकीय जागांच्या रिक्त पदाची भरती झालेली नाही. त्यामुळे तरुणांमध्ये तिव्र संतापाची लाट आहे. राज्य शासनाने तरुणांना नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करून देणे गरजेजे आहे. पोलीस दलातील ४० हजार पदांची भरती लवकरात लवकर करावी असे निवेदनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना युवा सेना अध्यक्ष अ‍ॅड.पंकज गोरे यांनी निवेदन दिले. यावेळी शहर प्रमुख संदिप मुळीक, ललीत पाटील, स्वप्निल सोनवणे, प्रेम खैरनार, निलेश चौधरी, सोनु गोरे, अमित खंडलेवाल आदी सहभागी झाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like