PM मोदी, आठवले आणि पवारांच्या वक्तव्यानं वाढवला ‘गोंधळ’, राष्ट्रवादी ‘बाजी’ मारणार की शिवसेनेचा होणार पत्ता ‘कट’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नसताना दिल्लीतील अनेक घडामोडींमुळे सध्या राज्यात गोंधळाचे वातावरण तयार झालेले आहे. दिल्लीत तीन वेगवेगळ्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार याबाबत संभ्रमावस्था तयार झाली आहे.

सगळ्यात आधी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या पहिल्याच भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेडी पक्षाचे चांगलेच कौतुक केले. पंतप्रधान यावेळी म्हणाले की, आज मी राष्ट्रवादी आणि बीजेडी या दोन पक्षांचं विशेष कौतुक करत आहे कारण यांनी संसदेचा कधीही नियम भंग केलेला नाही त्यामुळे इतर पक्षांनी सुद्धा यांच्याकडून ही बाबा शिकण्यासारखी आहे. अशा शब्दात पंतप्रधानांनी राष्ट्रवादी आणि बीजेडीचे कौतुक केले होते. राष्ट्रवादीच्या राज्यातील विधानसभेच्या जागांची आकडेवारी लक्षात घेता किंगमेकर असलेल्या राष्ट्र्वादीबाबत मोदींनी केलेल्या कौतुकाने राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

रामदास आठवलेंनी दिला सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला
भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून काम करणारे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील शिवसेना भाजपने सत्ता स्थापन करावी यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे रामदास आठवले म्हणाले की मी संजय राऊतांशी चर्चा केली. त्यांनी वाटाघाटी कराव्यात. मी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला सांगितली, त्यात भाजपला 3 वर्ष मुख्यमंत्रिपद आणि 2 वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद असे असेल. हा फॉर्म्युला भाजपने मान्य केला तर शिवसेनेने यावर विचार करावा. मी याबाबत भाजपशी देखील चर्चा करणार आहे. यामुळे भाजप सेना पुन्हा एकत्र येणार का याबाबत राज्यातील जनता विचार करू लागली आहे.

शरद पवारांच्या वक्तव्याने शिवसेनेची चिंता वाढली
शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली त्यानंतर बोलताना पवार म्हणाले, आमची राजकीय परिस्थिती बाबत बोलणी झाली मात्र सरकार बनवण्याबाबत आमची काहीही चर्चा झाली नाही. तसेच तुमचा पाठींबा कोणाला असेल असे जेव्हा पत्रकारांनी विचारले त्यावर पवार म्हणतात आम्ही सगळ्यांच्या सोबत आहोत. अशा वेळेस शरद पवारांनी दिलेल्या या वक्तव्याचे अनेक अर्थ होतात मात्र पवारांच्या या विधानाने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

मोदींनी केलेल्या कौतुकाबाबत पवार म्हणाले की, ही आपली परंपरा आहे आणि हीच आली नीती आहे. आम्ही भाजप विरोधातच निवडणुका लढवल्या असल्याचे देखील पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com