अटक केलेल्या ‘त्या’ पाच जणांच्या नजरकैदेत वाढ 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून देशाच्या विविध भागातून अटक करण्यात आलेल्या एल्गार परिषदेशी संबंधित पाच संशयितांना ६ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले होते. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान या पचही जणांना १२ सप्टेंबर पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

अटक केलेल्यांमध्ये देशातील नामवंत कार्यकर्ते, समाजसेवक यांचा समावेश आहे. यात सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वेरनोन गोन्सालविस,अरुण पाररिया, वरावर राव यांचा समावेश आहे. या सर्वांना ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले होत.

जाहीरात 

दरम्यान, एल्गार परिषदेमार्फत उद्रेक करायचा होता. नेपाळ आणि मणिपूरमधून हत्यारे आणण्याबाबतचा आणि बोलण्याचा अधिकार रावकडे होते अशी माहिती पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच एल्गार परिषदेमधून जनतेला भडकवण्याचा प्रयत्न होता.

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळे सीबीआयच्या ताब्यात

[amazon_link asins=’B01FM7GGFI,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44d31f20-b1af-11e8-a2bc-cd6a57834375′]