योगगुरु बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केली तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ॲलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचे वादग्रस्त विधान करणारे योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या अडचणी वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या विरोधात दिल्लीतील आयपी इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ED ची राज्यात मोठी कारवाई, ‘या’ कंपनीची तब्बल 166 कोटींची संपत्ती जप्त

देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत रामदेव बाबा लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी आयएमएने केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रामदेव बाबा कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवीत आहे, हा एक गुन्हा आहे. आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. योगगुरू रामदेव बाबा लसीचे दोन डोस घेऊनही देशात 10 हजार डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. ॲलोपॅथीच्या उपचारांमुळे देशात कोरोना रुग्णांनी जीव गमावला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव यांचे हे विधान अतिशय दुर्दैवी अन् शोभनीय आहे. दरम्यान सोशल मीडियावर सुरू असलेल्या अरेस्ट रामदेव या ट्रेंडवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदेव बाबा यांनी म्हटले आहे की, मला कोणी अटक करू शकत नाही.

 

तेलगंणातील नक्षल कमांडरचा कोरोनामुळे मृत्यु ! मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणामधील अनेक नक्षलवाद्यांना Covid-19ची लागण?

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच

केजरीवाल यांनी केला तिरंग्याचा अपमान, पांढर्‍या रंगाच्या ऐवजी हिरवा भाग वाढवला; केंद्रीय मंत्र्याचा आरोप

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या