खुशखबर ! कोकणात रेल्वे मार्गावरील AC डबल डेकर, तुतारीचे डबे वाढले

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास पावसाळ्यात सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश उत्सवामुळे प्रवाशांचे प्रमाण वाढते याच अनुषंगाने हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस १५ वरून १९ डब्यांची करण्यात येईल बदल्यात लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर ११ वरून १८ डब्यांची केली आहे. एसी डबल डेकरला २५ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी जादा डबे जोडण्यात येतील तर तुतारी एक्स्प्रेसला २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत जादा डबे जोडण्यात येणार आहेत. याचप्रमाणे दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेसला द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा तसेच तृतीय श्रेणीचा एक डबा आणि स्लीपर क्लासचे ७ आणि जनरल क्लासचे ८, सेकंड क्लासचे २ असे एकूण १९ डबे असतील.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सण समारंभासाठी गावी जाणाऱ्या कोकण वासियांना जरा आराम मिळणार आहे. एरवी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना खूप गर्दी नसते मात्र गणपती, नवरात्री, दिवाळी अशा सणांच्या काळात कोकण रेल्वेत प्रचंड गर्दी पहायला मिळते याच अनुषंगाने प्रमुख गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय प्रवाशांसाठी थोडा का होईना आराम देणारा ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –