17 कोटी कार्डधारकांना त्यांचं PAN रद्द होण्याचा ‘धोका’, जाणून घ्या तुमचं Card कसं ‘कॅन्सल’ होणार नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लागोपाठ 8 व्यांदा पॅन कार्ड आधारला लिंक करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. परंतु असे असले तरी जवळपास 17 कोटी पॅन कार्डधारकांनी अद्याप पॅन आधार लिंक केले नाही. पहिल्यांदा लिंक करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2019 होती. त्यानंतर ती वाढवून 31 मार्च 2020 केली आहे.

मागील अंतिम तारखेपूर्वी फक्त 30.75 कोटी पॅन कार्डधारकांना पॅन आधाराला लिंक केले होते. तर 48 कोटी पॅन कार्डधारकापैकी 17 कोटी 58 लाख पॅन रद्द होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे 31 मार्चपूर्वी पॅन आधार लिंक करणे आवश्यक आहे. हे तुम्ही अगदी सहज करु शकतात.

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले की जानेवारी 2020 पर्यंत 30.75 लाख पॅन आधारला लिंक केले गेले आहेत आणि बाकी पॅन रद्द होऊ शकतात. अर्थमंत्र्यांच्या मते 17.58 कार्डधारक असे आहेत, ज्यांनी अद्याप कार्ड लिंक केलेले नाही. याचे कारण लिंक करण्याबाबत माहिती नसले समजले जात आहे. ज्यासाठी सरकारने दिशा निर्देश जारी केले आहेत.

अर्थ विधेयक 2019 मध्ये संशोधनानंतर आता जे पॅन आधारला लिंक नसतील ते कार्ड आयकर विभाग निष्क्रिय घोषित करु शकते. आयकर अधिनियम धारा 139 एए च्या खंड 41 नुसार दिलेल्या कालावधीत लोक आधारकार्डची माहिती देणार नाहीत त्यांचे पॅन निर्षिय घोषित केले जाईल. हे संशोधन 1 सप्टेंबर 2019 मध्ये लागू केले होते. जर 31 मार्च 2020 पर्यंत पॅन कार्ड आधारला लिंक केले जाणार नाही तर तुमचे पॅन काहीही कामाचे नसेल. अनुराग ठाकूर म्हणाले की, मर्यादा वाढवल्याने लिंक न केलेल्या पॅन कार्डधारकांना फायदा होईल. अशाना अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डच्या मते निर्धारित 31 मार्चपर्यंत पॅन आधारला लिंक करणे आवश्यक आहे अन्यथा कार्ड अमान्य ठरवले जाईल. सीबीडीटीने यापूर्वी 7 वेळा मर्यादा वाढवली आहे परंतु आता पुढे आणखी मर्यादा वाढवण्याचा विचार नसेल. त्यामुळे पॅन लिंक न केल्यास ते अमान्य घोषित केले जाईल.

इनकम टॅक्स विभागाच्या वेबासाइटवरुन तुम्ही घरबसल्या हे काम करु शकतात –
यूजर्सला www.incometaxindiafiling.gov.in वर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक करण्याच्या पर्यायात पॅन, आधार नंबर आणि कॅप्चा एंटर करावा लागेल. ही माहिती भरल्यानंतर पॅन आधारला लिंक होईल. त्यानंतर आधार लिंक झाले की नाही हे पाहण्यासाठी पॅन कार्डधारक 567678 आणि 56161 या नंबरपैकी कोणत्याही नंबरवर आपल्या रजिस्टर नंबरवरुन UIDPAN वर 12 अंकी आधार आणि 10 अंकी पॅननंबर टाकून एसएमएस पाठवून स्टेट्स माहिती करुन घेऊ शकतात. नव्या नियमानुसार आता आधार पॅनची माहिती देणे आवश्यक आहे तसे न झाल्यास पगारातून 20 टक्के टीडीएस कापून घेतला जाईल. मोदी सरकारने यासंबंधित मोठी घोषणा केली आहे.

जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारणे तसे असेल तर कोणताही टॅक्स कापला जाणार नाही. परंतु तुमचे उत्पन्न 2.5 ते 5 लाखादरम्यान असेल तर तुम्हाला 5 टक्के टॅक्स भरावा लागेल. जर पगार 20 टक्के स्लॅबमध्ये असेल तर टीडीएस 20 टक्के असेल. जर तुमचे उत्पन्न 5 ते 10 लाख असेल तर 20 टक्के टॅक्स आकारला जाईल. परंतु आधार पॅन लिंक नसेल तर 20 टक्के टीडीएस कापला जाईल.

जर तुमचे उत्पन्न 30 टक्के स्लॅबमध्ये येत असेल आणि आधार पॅन लिंक नसेल तर टीडीएस कापण्यापूर्वी तुमच्या टॅक्सचा सरासरी दर काढला जाईल आणि सरासरी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर टीडीएस देखील त्या दराने कापला जाईल. जर पॅन आणि आधारमधील माहिती सारखी नसेल तर लिंक करताना ओटीपी जनरेट होणार नाही. ही माहिती पडताळून वेगळवेगळी असल्यास सारखी करुन घ्यावी त्यानंतर तुम्ही पॅन आधार लिंक करु शकतात.

पॅन आधारची लिंक ऑफलाइन केली जाते. यासाठी लोकांना एनएसडीएल किंवा यूटीआय आयटीएसएलच्या सेवा केंद्रावर जावे लागेल. येथे तुम्ही तुमची माहिती देऊन पॅन आणि आधार लिंक करु शकतात. येथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यात पॅन कार्ड आणि आधार कार्डची कॉपी द्यावी लागेल. ऑफलाइन प्रक्रियेत कोणतेही शुल्क दिले जात नाही.