काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची वाढती लोकप्रियता भाजपसाठी धोक्याची घंटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकप्रियता वाढत असल्याचे एका सर्वेतून स्पष्ट झाले आहे. यामुळे नरेंद्र मोदी व भाजपाच्या गोटात चिंता निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमधील जनतेने पंतप्रधानपदासाठी मोदींना डावलून राहुल गांधींना सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. तर कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमध्ये राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना कांटे की टक्कर दिली आहे. इंडिया टुडे आणि अ‍ॅक्सिस माय इंडिया या संस्थेने हा सर्वे केला आहे.

अण्णांनी सरकारची विनंती फेटाळली, २ ऑक्टोबरच्या आंदोलनावर ठाम
[amazon_link asins=’B07B6DM75J,B019MQLUZG,B073554FPW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4a340974-b8ac-11e8-afba-370b385c3294′]
या संस्थेने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील जनतेचे मत जाणून घेतले. या सर्वेमध्ये आंध्र प्रदेशमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त पसंती मिळविली आहे. आंध्र प्रदेशातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४४ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना तर नरेंद्र मोदींना ३८ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. या राज्यात तेलगू देसम पक्षाची पिछेहाट होताना दिसत आहे. ३९ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा दिला. तर ३८ टक्के लोकांनी चंद्राबाबू नायडू यांना पसंती दर्शवली आहे.
[amazon_link asins=’B074VJ4XHN,B074F1K12D’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53690f82-b8ac-11e8-9dd9-fb6c3bf4d3fa’]

सर्वेक्षणात कर्नाटकमध्ये काँग्रेस-जनता दल सेक्यूलर आघाडीबाबत जनतेत नाराजी असल्याचे दिसून आले. ३५ टक्के लोकांनी विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील सुमारे साडेअकरा हजार लोकांचे मत या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आले. कर्नाटकात ५५ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना तर ४२ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दर्शवली. तेलंगणात या सर्वेक्षणात ७, ११० लोकांचे मत जाणून घेण्यात आले. येथे के. चंद्रशेखर राव सरकारच्या कारभारावर ४८ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले. या राज्यात पंतप्रधानपदासाठी ४४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला. तर राहुल गांधींना ३९ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे.