प्राणायाम व ध्यान शिबिराला नागरिकांचा वाढतोय प्रतिसाद – आर्ट ऑफ लिव्हिंगचे नंदू जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता नकारात्मक होऊ पाहात आहे. प्राणायाम आणि ध्यान शिबिराच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे पुणे जिल्हा विकास समिती सदस्य नंदू जगताप यांनी सांगितले.

जगताप म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने “महाराष्ट्र मेडिटेट्स” या सेवा प्रकल्पा अंतर्गत मोफत ऑनलाइन प्राणायाम व ध्यान शिबिर घेतले जात आहे. कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांचे स्वास्थ्य अबाधित राहून सकारात्मक भूमिका वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी तज्ज्ञ योग व ध्यान प्रशिक्षकांकडून शारीरिक व मानसिक भीती नाहीशी करण्यासाठी विविध उपाय व साधना सांगण्यात येत आहेत. महाराष्ट्र मेडिटेट्सतर्फे सर्वांसाठी मोफत ऑनलाइन प्राणायाम व ध्यान शिबिर २१ मे २०२१ पासून सुरू करण्यात आले असून, ३१ मे २०२१ पर्यंत रोज सकाळी ६:०० ते ९:३० वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक दर अर्ध्या – अर्ध्या तासाने सुरू प्राणायाम आणि ध्यान कसे करावे यासाठीचे मार्गदर्शन केले जात आहे. ऑनलाइन प्राणायाम व ध्यान शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे राज्यस्तरीय योग प्रशिक्षक सहभागी साधकांना ध्यान व प्राणायामाचे धडे देत आहेत. या ऑनलाइन शिबिरात सहभागी होण्यासाठी सर्व महिला, पुरुष युवक, युवतींनी bit.ly/maharashtrameditates या लिंकवर मोफत नाव नोंदणी करून यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.