
IND vs AUS | भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या तिकीट खरेदीसाठी रांग ! चाहत्यांवर लाठीचार्ज
पोलीसनामा ऑनलाईन – IND vs AUS | सध्या टीम इंडिया (India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) T20 सीरीज सुरु आहे. या तीन सामन्यांच्या सिरींजमधील दुसरा सामना नागपूरमध्ये (Nagpur) खेळवण्यात येणार आहे. तसेच तिसरा आणि अंतिम सामना हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याआधी हैदराबादमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. (IND vs AUS)
काय घडले नेमके ?
तिसरा आणि अंतिम सामना हैदराबादमध्ये (Hyderabad) खेळवण्यात येणार असल्यामुळे चाहते खूपच उत्साहात आहेत. मॅचच्या तिकीट खरेदीसाठी जिमखाना ग्राऊंडच्या बाहेर सकाळी 3 वाजल्यापासूनच चाहत्यांनी रांग लागली होती. काही वेळाने हि रांग गर्दी वाढत गेली. अखेर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. यानंतर पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर लाठीमार (baton charge) करावा लागला. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. या लाठी हल्ल्यात आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये 4 महिला, 3 पुरुष आणि एका पोलिसाचा समावेश आहे. (IND vs AUS)
This is so disappointing. Passionated fans gathered at Gymkhana Ground to collect India Vs Australia tickets in Hyderabad and they're getting such treatment. pic.twitter.com/OIP96BClOH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2022
3 वर्षानंतर हैदराबादमध्ये मॅच
बऱ्याचकाळापासून हैदराबाद मध्ये कोणताही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता. त्यामुळे चाहते बऱ्यचकाळापासून याची वाट पाहत होते.
3 वर्षानंतर 25 सप्टेंबरला ही प्रतिक्षा संपणार आहे. विराट कोहली(Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma),
केएल राहुल (KL Rahul) आणि अन्य स्टार्सना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
हैदराबादमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध झाला होता.
यानंतर हैदराबादमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला नव्हता.
Web Title :- IND vs AUD | cricket fans and police clash hyderabad video viral fans gathered to collect ticket police lathicharge
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Health Tips | रोज सकाळी पोट होत नसेल स्वच्छ, अवलंबा ‘हे’ 8 उपाय, पोटात जमा झालेली घाण होईल दूर
Building slab collapses in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 4 जणांचा मृत्यू