IND vs AUS 1st Test | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; एक डाव अन 132 धावांनी मिळवला विजय

पोलीसनामा ऑनलाईन : IND vs AUS 1st Test | भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरमध्ये पार पडला. या सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारताने जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. या विजयासोबतच भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांची आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 32.2 षटकात 91 धावांवर सर्वबाद झाला. या डावामध्ये भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक 8 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला चांगलेच सतावले.

पहिल्या डावात रोहित शर्माच शतक, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच अर्धशतक तर शमीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 400 धावा करून सामन्यावर मजबूत पकड बनवली. भारताने सामन्यात तिसऱ्या दिवशी 223 धावांची आघाडी मिळवत ऑस्ट्रेलिया संघा समोर मजबूत आव्हान ठेवले. यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात आला परंतु भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. अवघ्या 91 धावांवर बाद होऊन ऑस्ट्रेलियाचा संघ तंबूत परतला आणि भारताने तिसऱ्याच दिवशी पहिल्या सामन्यावर विजय मिळवला. (IND vs AUS 1st Test)

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
हा निर्णय भारताने चुकीचा ठरवत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर गुंडाळला.
या खेळीमध्ये पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही.
यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल सर्वबाद 400 धावा केल्या होत्या. या कसोटीमध्ये रोहित शर्मा, रवींद्र जडेजा,
आर.अश्विन, अक्षर पटेल यांनी भारताच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली.
तसेच ऑस्ट्रेलिया संघाकडून टॉड मर्फीने भेदक गोलंदाजी करत आपली छाप पाडली आहे. त्याने या सामन्यातून ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते.

Web Title :- IND vs AUS 1st Test | india won a resounding victory over australia by an innings and 132 runs