IND vs AUS 2nd Test | सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराट कोहलीने रचला आणखी एक विश्वविक्रम

पोलीसनामा ऑनलाईन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील (IND vs AUS 2nd Test) दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. 5 दिवसांच्या कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या अडीच दिवसांत लागला आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकत एक विश्वविक्रम केला आहे. (IND vs AUS 2nd Test)

काय आहे तो विश्वविक्रम ?
विराट कोहलीने दिल्लीच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 8 वी धाव घेताच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 25 हजार धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने या बाबतीत सचिन तेंडुलकरलादेखील मागे टाकले आहे. सचिनने 577 डावात ही कामगिरी केली होती, तर आता विराट कोहलीने 549 व्या डावात ही कामगिरी केली आहे.

या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या प्रकरणात तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 588 डावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा विराट कोहली जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी 25 हजार किंवा त्याहून अधिक धावांचा टप्पा पार केला आहे. (IND vs AUS 2nd Test)

विराट कोहलीच्या तिन्ही फॉरमॅटमधील धावा
विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 12809 धावा केल्या आहेत.
तर कसोटी क्रिकेटमध्ये 8195धावा केल्या आहेत.
याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 4008 धावा केल्या आहेत.

Web Title :- IND vs AUS 2nd Test | virat kohli overtook sachin tendulkar to become the fastest to reach twenty five thousand runs in international cricket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय